01:45pm | Jul 17, 2020 |
पुसेगाव: प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही दुकान सुरू ठेवणार्या पुसेगाव व वर्धनगड (ता.खटाव) येथील दुकानदारांना चांगलेच महागात पडले आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून दुपारी दोननंतर दुकाने सुरू ठेवल्याप्रकरणी पुसेगाव येथील दोन व वर्धनगड येथील चार अशा एकूण सहा दुकान मालकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या वाढत चालल्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काही अटी व शर्तीच्या अधीन राहून काही शुक्रवारपासून (दि.9) सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत व्यवहार सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र मिशन बिगीन अगेनमध्ये दुकानांना उघडण्याबाबत दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेऊन जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून आज दिवसभरात पुसेगाव पोलिसांनी सहा दुकानदारांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
यात दिपलक्ष्मी स्वीट (पुसेगाव), समर्थ स्वीट (विसापूर फाटा), वर्धनी हॉटेल (वर्धनगड), हॉटेल मोरया (वर्धनगड), अमीर चिकन सेंटर (वर्धनगड), वर्धनी जनरल स्टोअर (वर्धनगड) या दुकानाच्या मालकांनी सकाळी नऊ वाजता आपली दुकाने सुरू केली. मात्र दुपारी दोन नंतरही ती सुरू असल्याचे आढळून आले. दुकाने दुपारी दोननंतर बंद करण्याच्या सूचना प्रशासनाकडून वारंवार देऊनही जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून मंगळवारी या सहा दुकानदारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी दिली.
सदरची कारवाई सपोनि विश्वजित घोडके यांचे मार्गदर्शनाखाली सचिन जगताप, सचिन भिलारे, अशोक सरक यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार श्री.जगताप हे करीत आहेत.
कोरोना संसर्ग वाढत असतानाही जे नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरतात. तसेच मास्क न लावता सुरक्षित शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करत नाहीत अशा व्यक्तीं वर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
- विश्वजित घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |