10:30pm | Nov 27, 2022 |
कराड : मित्राचा खून करून फरार झालेल्या संशयितास कराड पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.26 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास जुळेवाडी, ता. कराड गावच्या हद्दीतील पुजारी चौक येथे राजवर्धन महादेव पाटील वय 24, रा. जुळेवाडी, ता. कराड याचा त्याच गावातील विजय बाबुराव काशिद याने कोणत्यातरी धारदार हत्याराने राजवर्धन याच्या मानेवर, हातावर, पायावर, पाठीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केल्याने राजवर्धन गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान राजवर्धन याचा मृत्यू झाला. याप्रकरणी विजय काशिद याच्यावर खुनाचा गुन्हा कराड तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता.
हा गुन्हा गंभीर असल्याने पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलोस अधिक्षक बापु बांगर यांनी तपासकामी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देवुन सुचना दिल्या व मार्गदर्शन केले. तसेच कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील व कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या सुचनांनुसार कराड तालुका पोलीस स्टेशनचे स.पो.नि. बिराजदार, पो.उ.नि. आशिष जाधव, पोउनि भेरव कांबळे, पो. हवा. कुलकर्णी, पो.हवा. लावंड, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पो.ना. सज्जन जगताप, उत्तम कोळी, सचिन निकम तसेच पो.हवा. कांबळे, अमोल पवार, सचिन गुरव, संजय काटे यांची वेगवेगळी पथके तयार करुन रेठरे बु. किल्ले मच्छिंद्रगड, जि.सांगली तसेच काशिद याच्या नातेवाईकाकडे पहाटेपर्यंत शोध घेवुन गोपनीय माहितीच्या आधारे त्यास शेरे, ता. कराड येथुन ताब्यात घेतला. त्याला ताब्यात घेवुन विचारपुस केली असता आरोपी विजय बाबासो काशिद खोपकर वय 22, रा. जुळेवाडी, ता.कराड याने कोयत्याने चाकुने वार करुन खून केल्याचे कबुल केले असुन त्याने कोणत्या कारणावरुन खुन केला, याबाबत अधिक तपास सुरु आहे. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलोस अधिक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड डॉ. रणजीत पाटीले व कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड तालुका पोलीस स्टेशनचे स.पो.नि. बिराजदार, पो.उ.नि. आशिष जाधव, स.पो.नि. बिराजदार, पो.उ.नि. आशिष जाधव, पोउनि भेरव कांबळे, पो. हवा. कुलकर्णी, पो.हवा. लावंड, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पो.ना..सज्जन जगताप, उत्तम कोळी, सचिन निकम तसेच पो.हवा. कांबळे, अमोल पवार, सचिन गुरव, संजय काटे यांनी यांनी केली आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |