03:32pm | Sep 26, 2020 |
नाशिक: विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर आता उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतले आहे. राज्य सरकारमधील डझनभराहून अधिक मंत्र्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून ते क्वारंटाइन झाले आहेत.
‘माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी, असं आवाहन झिरवाळ यांनी केलं आहे. ’लवकरच करोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
झिरवाळ यांच्या मुंबई कार्यालयातील एक कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आल्यानं त्यांचे कार्यालय आधीच बंद करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी स्वतः आठ दिवस होम क्वारंटाइन राहणार असल्याचं जाहीर केलं होतं. ’मी कोणालाही भेटणार नाही. माझे कार्यालय व कामकाज सुरूच राहील,’ असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. कोणतीही अडचण असल्यास माझे स्वीय सहाय्यक धनराज भट्टड (9689345144) यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. आता त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं त्यांना 14 दिवस क्वारंटाइन राहावं लागणार आहे.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह सुनील केदार, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अब्दुल सत्तार, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे या मंत्र्यांना करोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे झाले आहेत. याशिवाय, राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींनाही करोनाची बाधा झाली आहे. लोकप्रतिनिधींमधील वाढता करोना संसर्ग हा सरकारसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |

अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |