पुसेगाव: एका बाजूला जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरू लागल्याचे आशादायक चित्र समोर येत असतानाच खटाव तालुक्यातील काही गावात अद्याप धोका संपला नसल्याचे दिसून येत आहे. खटावच्या पश्चिमेला जेमतेम 800 लोकसंख्या असलेल्या मेघलदरेवाडीत (रामोशीवाडी) काही दिवसांपूर्वी घेतलेल्या आरोग्य तपासणीत धक्कादायक बातमी पुढे आली. एकाच वस्तीवर 50 च्यावर बाधित सापडल्याने आरोग्य प्रशासनाबरोबरच आजूबाजूची गावंही हादरून गेली. त्यानंतर येथील प्रत्येक वाड्यावस्त्यांवर तपासणी कॅम्पचे आयोजन करूनही नागरिक तपासणी करायला पुढे येत नसल्याने प्रशासनाने जाखणगाव येथील चौकात पोलिस प्रशासनाचे सहकार्य घेत भेटेल त्या प्रवाशांना थांबवून त्यांची तपासणी करण्याचा नविन फंडा सुरू केला आहे.
पहिल्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव फक्त शहरांपुरता मर्यादीत होता. मात्र दुसर्या लाटेत ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण अधिक वाढले आहे. यातून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या कामगिरीवर चारीबाजूने टिकांचा भडीमार होताना दिसत आहे. खटावच्या आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असणार्या गावांतील नागरिकांना दहा, दहा किलोमीटरचा टेस्टसाठी प्रवास करायला न लागावा म्हणून येथील थेट गाव, वस्त्या व वाड्यावर पोहचून कॅम्पचे आयोजन वरचेवर करण्यात येत आहे.
मात्र येथील नागरिक या चाचण्या सहजासहजी करून घेण्यास तयार होत नसल्याचे दिसत आहे. रामोशीवाडीत मोठ्या संख्येने रुग्ण सापडू लागल्याने जवळपासच्या वाड्यावस्त्यांत तपासणी कॅम्पचे भरवण्यात आले. पैकी गादेवाडी येथे कॅम्प भरवून एकही नागरिक तपासणीला फिरकला नसल्याने प्रशासनाला रिकाम्या हाताने परत फिरावे लागले.त्यामुळे आता नाईलाजास्तव पोलिसांचा धाक दाखवून जाखणगाव चौकात वरचेवर भेटेल त्या प्रत्येक प्रवाशांची तपासणीचे काम हाती घेण्यात आले असल्याचे खटाव प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डॉ.पराग रणदिवे यांनी सांगितले.
अगोदर कोरोनाचे संक्रमण शहरातून खेड्यात झाले. आता छोट्या वाड्या वस्त्यांमध्ये कोरोना दबा धरून बसलेला असून अद्याप भय संपले नाही. त्यामुळे कोरोनापासून मुक्ती हवी असेल तर या खेड्यात वरचेवर तपासणी कॅम्पचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे मत आरोग्य सेवक चंद्रशेखर सावळकर, नोडल अधिकारी दादासाहेब बोराटे, सत्यवान सानप, आरोग्य अधिकारी माधुरी फडतरे यांनी स्वानुभवातून व्यक्त केले. यावेळी अंगणवाडी सेविका सुनिता काटकर, आरोग्य सेविका माया पवार, संकेत पवार उपस्थित होते.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |