10:33am | Mar 25, 2021 |
फलटण : भारतीय सैन्य व नौदलातील बोगस सैन्य भरती प्रकरणातील संशयित आरोपी आकाश काशिनाथ डांगे उर्फ राजाबाबू याच्यासह चार ते पाचजणांनी भाडळी बु॥ ता. फलटण येथील एका घरावर सशस्त्र हल्ला करुन महिलेस व तिच्या मुलास बेदम मारहाण केल्याचे प्रकरण घडले असून याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आकाश काशिनाथ डांगे (वय 25, रा. भाडळी बु॥ ता. फलटण) याच्यावर भिगवण, जि. पुणे येथे तसेच राज्यातील विविध ठिकाणी भारतीय सैन्य व नौदलातील बोगस सैन्य भरती प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकडून आकाश डांगेची उचलबांगडीही करण्यात आली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. जामिनावर बाहेर असताना माझ्या बातम्या तू माध्यमांना (वर्तमानपत्र) पुरवतो, असे म्हणत आकाश डांगेने त्याच्याच भावकीतील विजयकुमार डांगे यांना अनेकदा धमकावून मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. असे असताना काल रात्री दि. 24 रोजी साडेअकराच्या दरम्यान स्वागत चव्हाण (रा. झिरपवाडी, ता. फलटण), सचिन चांगण (रा. सासकल, ता. फलटण), अर्जुन पिसाळ (रा. भाडळी खु॥ यांच्यासह आकाश काशिनाथ डांगे या चौघांनी मिळून विजयकुमार डांगे यांच्या घरावर सशस्त्र हल्ला चढवला. यावेळी विजयकुमार डांगे हे कामानिमित्त बाहेरगावी असल्याने संशयित चौघांनी विजयकुमार डांगे यांच्या घराचा दरवाजा तोडून तुझा नवरा आमच्या बातम्या पेपरला देतो, असे म्हणत डांगे यांच्या पत्नीला बेदम मारहाण केली. यावेळी विजयकुमार डांगे यांचा मुलगा माझ्या आईला का मारता, असे म्हणत आईला वाचवित असताना या चौघांनी त्या मुलासही गंभीर मारहाण केली. या प्रकरणाची माहिती फलटण ग्रामीण पोलिसांना समजल्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नि. नितीन सावंत व कर्मचार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून विजयकुमार डांगे यांच्या पत्नी व मुलास तात्काळ फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतर फलटण पोलिसांनी आकाश डांगेसह चौघांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून या प्रकरणी पो. हे.कॉ. रामदास लिम्हण अधिक तपास करीत आहेत.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |