02:24pm | Sep 28, 2022 |
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूर आणि आई शोभा कपूर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. बिहार न्यायालयाने या दोघींविरुद्ध अटक वॉरंट जारी केला आहे. वेबसीरीज XXX संदर्भात कोर्टाने हे अटक वॉरंट जारी केलं आहे. ज्यामध्ये देशाच्या सैनिकांच्या पत्नीचे सैनिकांच्या गणवेशात इतर लोकांशी शारीरिक संबंध असल्याचे दाखवण्यात आले होते. आता बिहारच्या बेगुसरायमध्ये दाखल झालेल्या या तक्रारानंतर अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एकता कपूरच्या या वेबसीरिजला लष्कराचा अपमान मानून गेल्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये बेगुसरायच्या कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी कोर्टाने एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना बेगुसरायचे वकील हृषिकेश पाठक यांनी सांगितलं की, वेबसीरिज कंपनीच्या निर्मात्या एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी ही निकृष्ट वेबसीरिज एका वेब पोर्टलवर टाकली होती. ज्यामध्ये भारतीय सैनिकांचा अपमान करण्यात आला होता. देशाचं रक्षण करणारे भारतीय सैनिक, ज्यांच्यामुळे प्रत्येक व्यक्ती आज सुरक्षित आहे.
या वेबसीरिजमध्ये सैनिकांच्या पत्नीबाबत काही अत्यंत चुकीचे सीन दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. अधिवक्ता पाठक यांनी सांगितले की, या वेब सीरिजच्या निर्मात्यांवर विविध जिल्ह्यांमध्ये खटला दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात बेगुसरायमध्येही एक्स-सर्व्हिसमेन सेलचे शंभू कुमार यांनी बेगुसराय कोर्टात खटला दाखल केला होता.
समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील वकिलाने सांगितलं की, हे प्रकरण राजीव कुमार यांच्या कोर्टातून विकास कुमार यांच्या कोर्टात हस्तांतरित करण्यात आलं आहे. आणि तेथूनच हे अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. अधिवक्ता हृषिकेश पाठक यांनी सांगितलं की, तमिला अहवालाची पुष्टी करताना या दोघींविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |