सातारा: सातारा हा शूरविरांचा जिल्हा असून अशा या ऐतिहासिक जिल्ह्यात काम करण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला अभिमान आहे, अशा शब्दात नूतन जिल्हा पोलीस अधिक्षक अजय बन्सल यांनी आपली भावना व्यक्त केली. सातारकरांच्यावतीने आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बन्सल यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
नूतन पोलीस अधिक्षक बन्सल यांनी पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी पोलीस मुख्यालयात जावून बन्सल यांची भेट घेतली. आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारकर आणि तमाम जिल्हावासियांच्यावतीने बन्सल यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, अनिल देसाई, नगरसेवक अविनाश कदम, बाजार समितीचे चेअरमन विक्रम पवार आदी उपस्थित होते.
सातारकर हे शांत आणि संयमी म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्ह्यातील जनताही शांत आणि संयमी आहे. तमाम जिल्हावासियांचे पोलीस प्रशासनाला नेमहीच सहकार्य असते आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वचजण पोलीस प्रशासनाला मदत करत असतात असे सांगून आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात जनतेच्यावतीने नूतन एस.पी.बन्सल यांचे स्वागत केले. यावेळी सातारा जिल्ह्यातील विविध विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली. या शांतताप्रिय जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवतानाच सुशासन आणि लोकाभिमुख कामकाज करु आणि जनतेच्या अपेक्षा सार्थ ठरवू, असे आश्वासन बन्सल यांनी यावेळी दिले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |