07:33pm | Aug 20, 2022 |
पुसेगाव : चारचाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक करीत असताना पुसेगाव ते बुध या पोलीस स्टेशनच्या हद्दी दरम्यान पुसेगाव पोलिसांच्या छाप्यात देशी दारूच्या बाटल्यासह एकूण 2 लाख 25 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पुसेगाव पोलीस स्टेशन कडून देण्यात आली आहे.
याबाबत पुसेगाव पोलीस स्टेशन सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल व अप्पर पोलीस अधिकारी अजित बोऱ्हाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी दहीहंडी उत्सवाच्या अनुषंगाने पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सक्त पेट्रोलिंग नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यास अनुसरून दिनांक 18 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास स.पो.नी संदीप शितोळे यांना गोपनीय माहितीच्या आधारे एक असेंट कंपनीची चार चाकी गाडी (क्र. एमएच 11 वाय 1615) प्रदीप सोमन्ना गौडा वय 35 राहणार पुसेगाव याचे गाडीतून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पुसेगाव ते बुध या रस्त्यावर नाकाबंदी दरम्यान वाहने चेक करत असताना संशयित चारचाकी गाडी बुधकडून पुसेगाव कडे येत असताना पुसेगाव हद्दीत नाकाबंदी दरम्यान त्या गाडीची झडती घेत असताना 3500 रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या या इसमाकडे सापडल्या. त्या जप्त करण्यात आल्या. अधिक चौकशी केली असता चालक उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यास ताब्यात घेतले व गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत असेंट कंपनीची चारचाकी गाडी व दारूच्या बाटल्या असा एकूण दोन लाख 53 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक विपुल भोसले करीत आहेत. या कारवाईमध्ये सपोनी संदीप शितोळे, जगन्नाथ लबाळ, संभाजी माने, पोपट बिचुकले, विलास घोरपडे, सचिन जगताप सहभागी होते.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |