03:06pm | Jul 10, 2020 |
पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाढता कोरोना बाधितां आकडा चिंता वाढवणारा ठरू लागला आहे. वारंवार आवाहन करूनही काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे अनेक नागरिक मास्क न वापरता फिरत आहेत. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येत्या सोमवारपासून म्हणजे दि. 13 जुलैपासून पुढचे 15 दिवस लॉकडाउन असेल. लवकरच याची सविस्तर नियमावली जारी केली जाणार आहे
दरम्यान, कंटेनमेंट झोन वगळता पुण्यातील काही भागात लॉकडाऊन शिथिल केला होता. मात्र, अद्यापही करोनाचा धोका टळलेला नाही. करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. पुणे आणि पिपंरी चिंचवडमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात करोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. शहरांसह लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील वाढती रुग्णसंख्या पाहून प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.
पुणे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 30 हजारांकडे गेली आहे. यापैकी 13 हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. तर 900 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसागणिक पुणे आणि पिंपरीमधील करोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |