12:58pm | Aug 28, 2020 |
बुध: खटाव तालुक्यात सध्या उत्तर भागात बटाटा पिक जोमात आले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारो एकर शेतीक्षेत्रात बटाटा पिकाची लागवड केली गेली आहे. सद्यस्थितीत फुलोर्यात आलेल्या बटाटा शेतीचे नयनरम्य दृश्य जागोजागी पहावयास मिळत आहे. परिसरातील शेतकरी वर्गाची या पिकाला भर देण्याची धांदल सुरू आहे. या वर्षी बटाट्याला पोषक वातावरण लाभल्याने हे पीक शेतकर्यांना भरघोस उत्पन्न मिळवून देईल अशी शेतकरी वर्गातून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
खटाव तालुका हा अलिकडे कांदा, बटाटा, आले पिकाचे आगार म्हणून नावालौकीकास येत आहे. अलिकडे खरीप हंगामात तालुक्यात बटाटा हे मुख्य पिक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. बटाटा हे भांडवली पिक म्हणून ओळखले जाते. या पिकाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते, भांडवलही गुंतवावे लागते. डोळ्यात तेल घालून प्रत्येक रोपाची अक्षरशः शेवटच्या दिवसापर्यंत काळजी घ्यावी लागते. दर नऊ ते दहा दिवसाला महागडी फवारणी करावीच लागते. थंड हवामान या पिकाला पोषक असते. मात्र उन पडले की लगेच फवारणी करावी लागते.
अलिकडच्या काळात बियाणांचे गगनाला भिडलेले दर, खतांचे वाढते दर, तणनाशक, जंतुनाशक फवारण्यावर होणारा वारेमाप खर्च व एवढे करून शेवटी दराची व लहरी हवामानामुळे उत्पन्नाची खात्री नसते. त्यामुळे बटाटा पिक सर्वसामान्य शेतकर्यांच्या आवाक्या बाहेर जात चालल्याच चित्र जाणवू लागले आहे. त्यातही काही शेतकरी चार पैशे मिळतील या अपेक्षेने बटाटा लागण करत असतात. काही वेळेस बटाटा बियाणे खराब लागल्याच्याही तक्रारही शेतकर्यांमधून येत असतात.
बटाट्याच्या झाडाची काळजी शेवटच्या दिवसापर्यंत घ्यावी लागते. थोड्याशा हलगर्जीपणामुळे हातचे पिक वाया जाण्याची शक्यता असते. शिवाय पोषक हवामान नसेल तरी देखील बटाटा हाताला लागत नाही. गुंतवलेले भांडवल देखील काही वेळेस हाताला लागत नाही. कर्जबाजारीपणाला सामोरे जावे लागते. त्यात भरीस भर कोरोनामुळे शेतकर्यावर अगोदरच दुधाने पोळल्यामुळे ताकही फुंकून प्यायची वेळ आली आहे. या आगोदर संचारबंदीमुळे तयार माल जाग्यावरच नासून गेला आहे. त्यामुळे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकरी जोखीमीवर जोखीम पत्करत आहे. यावेळचे बटाटा पिक तरी जोमात दिसत आहे. एकरी 22 ते 23 टन उत्पादन मिळवण्याचे शेतकर्यांचे उदिष्ट आहे. बटाटा पिकाला यावेळी चांगला दर मिळून बर्याच दिवसातून चार पैसे शिल्लक राहण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
सध्या बाजारात खाण्याच्या बटाटासाठी ज्योती तर बटाटा चिप्ससाठी 1533, एफसी-3, एटीएल, बियाणांना अधिक मागणी आहे. या सर्व पिकांचा कालावधी जवळपास 90 दिवसांचा आसतो. बहुतांशी शेतकरी दराच्या बाबतीत कंपनीशी करार करणे पसंत करतात. यावर्षी कंपनीने 17 च्या आसपास दर जाहीर केला आहे. आजपर्यंत लागण होऊन 35 ते 40 दिवस होऊन बटाटा भरीला आला आहे. बटाट्याला भर दिल्याने रान भसभुशीत होऊन बटाटा पोसायला मदत होत असते. या पिकाला करपा रोगापासून जास्त धोका असतो. थोडे जरी हवामान बदलले तरी लगेच फवारणीची आवश्यकता आसते. संचारबंदीच्या काळात बाजारपेठा बंद असल्याने शेतीमाल बांधावरच सडून गेला होता. त्यामुळे अगोदरच आवसान गळून गेलेल्या शेतकर्याला नवीन मालाला योग्य भाव मिळाला तर सावरण्याच्या आशा आसल्याचे मत प्रगतशील शेतकरी सुखदेव शिंदे यांनी व्यक्त केली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |