03:01pm | Jun 25, 2020 |
विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशमध्ये कोरोनामुळे एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लक्षणे दिसताच डॉक्टर दवाखान्यात दाखल झाले परंतु दुसर्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे सध्या देशात कोरोनाची चिंता वाढली आहे. लक्षणरहित कोरोनाच्या या प्रकारामुळे आंध्रमध्ये सध्या चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
विजयवाडाच्या एआरटी सेंटरमधील सरकारी दवाखान्यातील डॉक्टरला अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागला. छातीत त्रास होत असल्याचं एक्स-रेमध्ये समोर आल्यानंतर या डॉक्टरला कोविड वॉर्डात भरती करण्यात आलं. पण याच दिवशी या डॉक्टरचा करोना वॉर्डात मृत्यू झाला. मृत्यूच्या एक दिवस अगोदरपर्यंत या डॉक्टरने करोनाबाधित रुग्णांची सेवा केली आणि करोनाचं कोणतंही लक्षण आढळून आलं नव्हतं. पण या डॉक्टरच्या मृत्यूने आंध्र प्रदेशात लक्षणं नसलेल्या व्यक्तींचाही मृत्यू होत असल्यावर प्रकाश टाकला आहे. राज्यात अशाच अनेक घटना घडत असल्याची माहिती आहे. करोनाचं कोणतंही लक्षण दिसून येत नाही, पण अचानक छातीत त्रास होऊन मृत्यू होत आहे.
डॉक्टरांच्या मते, लक्षणरहित रुग्ण स्थिर दिसत असला तरी विषाणूने शरीरातील अवयवांवर अगोदरच हल्ला केलेला असतो. यामुळे रुग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना पुरेसा वेळही मिळत नाही. रुग्ण बरं होण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे रोगाची तीव्रता आणि दुसरं म्हणजे रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती महत्त्वाची आहे, अशी माहिती सेव्हल हिल्स रुग्णालयातील कन्सल्टंट पल्मोनोलॉजिस्ट डॉ. वामसी कृष्णा यांनी दिली.
दरम्यान, काही करोना रुग्णांमध्ये ऑक्सिजन कमी झाला तरी ते स्थिर राहतात. पण लक्षणं नसतानाही शांत हायपोक्सिया आणि संबंधित घटकांमुळे रुग्णाचा अचानक मृत्यू होतो. याच प्रकारामुळे देशातील रुग्णांची चिंता वाढली आहे. कोणतंही लक्षण नसताना अचानक रुग्ण दगावल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे कोणताही त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला जात आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |