फलटण : मौजे सासकल रस्त्याचा प्रश्न हा कायमच ऐरणीवर राहिला आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी करणे किंवा कायमस्वरूपी डांबरीकरण करणे ही कित्येक वर्षांची ग्रामस्थांची मागणी कधी पूर्ण होणार? भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे उलटली तरी नागरिकांना मूलभूत प्रश्नांसाठी आंदोलने करण्याची व प्रशासकीय कार्यालयांमध्ये रस्त्याच्या कामी हेलपाटे मारण्याची आता सवय झाली आहे. अनेक निवडणुका झाल्या, मग त्या ग्रामपंचायतींच्या असतील, जिल्हा परिषदेच्या असतील, विधानसभा व लोकसभेची असतील, लोकप्रतिनिधी उमेदवार म्हणून गावात येतात, आश्वासनांची खैरात करतात. या सर्वांसमोर कायम ग्रामस्थांनी रस्त्याची मागणी केलेली असताना निवडून आल्यानंतर मात्र या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष केले जाते. अनेक गावांमध्ये एकेक रस्ता अनेक वेळा डांबरीकरण झाला आहे. नेमकं सासकलचाच रस्त्याच्या वेळी माशी कुठे शिंकते, हाच प्रश्न पडतो.
फलटण- दहिवडी या मुख्य रस्त्यापासून सासकल गावठाणास जाणारा जोड रस्त्यांवर भाडळी बुद्रुक हद्दीतील गट नंबर १९५, १९२, १९० मध्ये संबंधिताने अडविलेला रस्ता महसूल कोर्टामध्ये वर्षभर केस लढून रस्ता सासकल ग्रामस्थांसाठी खुला करत असल्याचा निकाल सासकल ग्रामस्थांच्या बाजूने दिलेला असतानासुद्धा प्रशासनाने यासंदर्भात योग्य ती कारवाई केली नाही. याही घटनेला आता जवळजवळ बारा वर्षे उलटली आहेत. ही केस अॅडव्होकेट रामचंद्र घोरपडे यांनी विनामोबदला लढून सासकल गावासाठी सदर रस्ता खुला करुन घेतला. या कामी पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा रस्ता खुल्या करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. रस्ता ग्रामस्थांसाठी खुला झाल्यानंतर विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक निंबाळकर व आ. दीपक चव्हाण यांच्या उपस्थितीत या रस्त्याचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले होते. या रस्त्याला विरोध करणार्या भाडळी बुद्रुक गावच्या नागरिकांनी, शेतकर्यांनी अतिशय सामंजस्याची भूमिका घेऊन सासकल ग्रामस्थांना व प्रशासनाला सहकार्य केले आहे. त्यामुळे हा रस्ता बनवत असतानाच या रस्त्याच्या लगत असणाऱ्या शेतकऱ्यांचे कोणत्याही स्वरुपाचे नुकसान न करता हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा. तरीही सासकल गावचा रस्ता हा रामभरोसेच आहे.
सासकल गाव हे फलटण तालुक्यातील छोटे गाव असून चारही बाजूने गावात येण्यासाठी ओढ्यावरूनच यावे लागते. याच ओढ्यावर वेगवेगळ्या निधीतून तीन पूल बांधण्यात आले आहेत. यापैकी दोन पूल हे गेल्या दोन वर्षांपूर्वीच वाहून गेले. त्यावर कोणत्याही प्रकारची पुढील कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामधील एक पूल हा मौजे सासकल येथील हरिजन वस्तीस जोडणारा होता. या पुलासाठी २६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. ढिसाळ व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पहिल्याच पावसात हा साकव पूल वाहून गेला. हा पूल बांधताना मागासवर्गीय निधीचा गैरवापर झाल्याची ग्रामस्थांनी तक्रार केली होती. याच ओढयावर या साकव पुलापूर्वी बांधण्यात आलेला साकव पुल म्हणजे सासकल गावठाण ते गिरवी रोड या रस्त्यावरील हा साकव पूल गेल्या वर्षी आलेल्या पावसात वाहून गेला. हा साकव धनराज मजूर सहकारी संस्था मर्यादित फलटण यांनी सन २०१३ मध्ये नियमित साकव कार्यक्रम याअंतर्गत रक्कम रु १२ लाख खर्च करून बांधला होता. त्यामुळे हे दोन्ही साकव पूल वाहून गेल्यामुळे संबंधित रस्त्यावरीलच साकव पूल हा येण्या जाण्यासाठी एकमेव मार्ग राहिला असल्यामुळे याच रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे.
या रस्त्यावरील एक किलोमीटरचे डांबरीकरण सोडले तर इतर खडीकरण झालेल्या व मुरमीकरण झालेल्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी पाणी साचून चिखल होऊन अपघात होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे अनेक लोकांचे अपघात होऊन लोक घसरून पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणे गरजेचे आहे. पावसाळा सुरू झाला की या रस्त्याचा प्रश्न कायमच ऐरणीवर येतो. प्रशासनाने कायमस्वरुपी डांबरीकरण करून हा रस्ता वाहतुकीसाठी, रहदारीसाठी पूर्ववत करण्याची ग्रामस्थांची कायमची मागणी आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |