01:33pm | Jun 29, 2020 |
नवी दिल्ली: कुरापतखोर चीनला धडा शिकवण्यासाठी ‘आत्मनिर्भरता’ हा एकमेव उपाय असल्याचे सांगत केंद्र सरकारने चीनमधील आयातीवर निर्बंध लादले. संपूर्ण देशभरातून चीनी मालाविषयी प्रचंड राग व्यक्त होवू लागला. चीन वस्तूंविरोधात बहिष्काराचे हत्यार अनेकांनी उपसले. त्यामुळे बर्याच चिनी कंपन्यांच्या भारतातील शोरूमसमोर ‘मेड इन इंडिया’ चे फलकही झळकले. मात्र औषध कंपन्यांसमोर या निर्णयामुळे नवे संकट उभे राहिले असल्याचे वृत्त सीएनबीसी टीव्ही 18 ने दिले आहे.
दरम्यान, गलवान खोर्यातील संघर्षानंतर चिनी सामानावर बहिष्कार घालण्याची, चीनमधून आयात बंद करण्याची मागणी होत आहे. पण सध्या याचा भारतीय औषध कंपन्यांना फटका बसत आहे. भारतीय औषध कंपन्यांनी चीनमधून आयात केलेला माल बंदरात अडकून पडला आहे. त्यामुळे औषध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारतीय औषध कंपन्यांनी वरिष्ठ सरकारी कार्यालयं आणि पंतप्रधान कार्यालयाला आयातीला मंजुरी देण्यासाठी साकडं घातलं आहे. औषध निर्मितीसाठी चीनमधून मागवलेला कच्चा माल, द्रव्य, उजतखऊ-19 उपकरणे जवाहरलाल नेहरु बंदर आणि दिल्ली विमानतळावर अडकून पडली आहेत. सीएनबीसी टीव्ही 18 ने हे वृत्त दिले.
बंदरामधून हा माल बाहेर निघाला तर औषध कंपन्यांपर्यंत पोहोचू शकतो. पण आवश्यक मंजुरीविना हा माल अजून बंदरामध्येच आहे. आयातील प्राधान्य देऊन झटपट मंजुरी दिली नाही तर 90 ते 100 टक्के उत्पादन कायम ठेवणे कठिण आहे तसेच करोना व्हायरसच्या या संकटकाळात औषध पुरवठयाची साखळी सुद्धा विस्कळीत होईल असे औषध क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. औषध उद्योगाने तात्काळ सरकारी हस्तक्षेपाची मागणी केली आहे. औषध क्षेत्रासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय चांगले आहेत पण आत्मनिर्भर व्हायला वेळ लागेल असे औषध क्षेत्रातील कंपन्यांचे म्हणणे आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |