12:04pm | Jun 08, 2020 |
लंडन: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे चाहते जगभर आहेत. सचिनचे शतक पाहण्यासाठी जगभर अनेक चाहते उत्सूक असतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बाद करण्याचे स्वप्न प्रत्येक गोलंदाजाचे असायचे. त्यातही सचिनला शतकाच्या जवळ बाद करणे म्हणजे तर स्वत:च्या संघासाठी हिरो होण्याची संधी असायची. सचिनला एकदा नव्वदीमध्ये बाद करणार्या गोलंदाजाने एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.
सध्या इंग्लंडच्या संघातून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज टीम ब्रेसनेसने दावा केला की, 2011च्या कसोटी मालिकेत सचिनला 100व्या आंतरराष्ट्रीय शतकापासून रोखल्यानंतर त्याला आणि ऑस्ट्रेलियाचे अंपायर रोड टकर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. सचिनने 2011च्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 99वे आंतरराष्ट्रीय शतक केले होते. इंग्लंडविरुद्ध ओव्हल येथील चौथ्या कसोटी सामन्यातील दुसर्या डावात तो 91 धावांवर खेळत असताना माझ्या चेंडूवर एलबीडब्ल्यू बाद झाला.
’यॉर्कशर क्रिकेट: कव्हर्स ऑफ’ या पॉडकास्ट कार्यक्रमात ब्रेसनेस म्हणाला, माझा तो चेंडू विकेटच्या बाहेर जात होता. ऑस्ट्रेलियाचे अंपायर टकर यांनी माझ्या अपीलनंतर त्याला बाद दिले. सचिन तेव्हा 80च्या(91 धावांवर) आसपास खेळत होता. अंपायर टकर यांनी त्याला बाद दिले नसते तर निश्चित सचिनने शतक केले असते. पण आम्ही मालिका जिंकली आणि जगातील अव्वल क्रमांकाचा संघ ठरलो.
सचिनला बाद केल्यानंतर मला आणि अंपायर टकर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. ही धमकी एकदा नाही तर अनेक वेळा मिळाल्याचे ब्रेसनेस म्हणाला. मला ट्विटवर आणि घरी पत्र पाठवून धमकी देत असत. तुम्ही सचिनला बाद कसे काय दिले. चेंडू लेग साइडला बाहेर जात होता, असे पत्रात लिहलेले असायचे.
जास्त प्रमाणात धमकी मिळत असल्याने टकर यांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली होती, असा दावा ब्रेसनेसने केला. सचिनला बाद केल्यानंतरच्या काही महिन्यांनी टकर मला भेटले आणि त्यांनी सांगितले की, मित्रा मला सुरक्षा कर्मचारी ठेवावा लागला. ऑस्ट्रेलियात टकर यांच्या घराबाहेर पोलिस सुरक्षा देण्यात आली होती.
त्यानंतर सचिन तेंडुलकरने 2012च्या आशिया कप स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी केली आणि शतकांचे शतक पूर्ण केले. ऑक्टोबर 2013 मध्ये सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सचिनच्या नावावर कसोटीत 15 हजार 921 तर वनडेत 18 हजार 426 धावा आहेत.
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |
जनता बँकेच्यावतीने सत्कार हा माझा घरचा सत्कार : शहाजी क्षीरसगार |
मोबाईल आहे, नेट नाही; त्यामुळे वर्क होईना |
फलटण ग्रामीण पोलिसांनी केली दरोडा टाकणारी टोळी जेरबंद |
जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 56 हजार पार |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |
157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |
157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
माराच्या भितीपोटी अल्पवयीन मुलाने केला चोरीचा बनाव |
ग्रेड सेपरेटरमध्ये केलेले स्टंट युवकास भोवले; गुन्हा दाखल |
अतीमद्य प्राशनाने एकाचा मृत्यू |
विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |