10:52am | Sep 15, 2020 |
सातारा : शहरातील पुष्कर मंगल कार्यालयात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटूंबियांच्यावतीने उभारण्यात आलेल्या 82 बेडच्या कोविड सेंटरचा हस्तांतरण सोहळा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले व सौ वेदांतिकाराजे भोसले, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, नायब तहसीलदार सुनील मुनावळे, नगरसेवक अविनाश कदम, अमोल मोहिते, धनंजय जांभळे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, आ. शिवेंद्रराजे भोसले कुटुंबियांनी उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी जिल्हा शासकीय रूग्णालयांच्या माध्यमातून वैद्यकीय स्टाफ देण्यात आला आहे. या सेंटरच्या माध्यमातून रूग्णांना चांगल्या सेवा उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, या कोविड सेंटरमध्ये 42 ऑक्सिजन तर 40 जनरल बेड आहेत. सध्याच्या घडीला ऑक्सिजन बेडसाठी वणवण फिरावे लागत आहेत. ही वेळ दुर्दैवाने कुणावर येऊ नये. त्यातूनही कोणी बाधित झाला तर याठिकाणी जिल्ह्यातून कोणत्याही भागातून रुग्ण याठिकाणी येवून उपचार घेवू शकतो. याचे नियंत्रण सिव्हिल हॉस्पिटल करणार आहेत. त्यामुळे विनामोबदला रुग्णांना उपचार मिळेल. कोरोनाचे आकडे वाढत असताना केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता जे शक्य होईल ते करत आहोत. गंभीर परिस्थितीत फिजिशियन, डॉक्टर्स आणि स्टाफची कमतरता जाणवत आहे. यामुळे हे सेंटर सुरू करण्यास विलंब झाला.
या संकटकाळात केवळ प्रशासनावर जबाबदारी ढकलता येणार नाही. प्रशासनानेच सर्व बघावे, अशी अपेक्षा आहे परंतु, प्रशासनातही माणसेच आहे. त्यांच्याकडे जादूची कांडी नाही. त्यांचे ते काम करत आहेत. त्यांच्या कार्यात आपलाही सातारकर म्हणून सहभाग असावा. तसेच मेढा येथेही मेढा ग्रामीण रुग्णालयात 30 बेडचे कोव्हिड केअर सेंटर सुरु करण्यात येत आहे. तेथे डिजिटल एक्स-रे मशीनची गरज आहे. त्याठिकाणी एक्स-रे मशीन देणार आहे.
सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या, सध्याच्या परिस्थितीत बाधितांसाठी बेडची कमरता जाणवत आहे. त्यामुळे हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. यामुळे प्रशासनाला थोडा हातभार लागण्यास मदत होणार आहे.
यावेळी सौ. सुनेशा शहा, अॅड. प्रशांत खामकर, विठ्ठल बलशेटवार, विश्वास गोसावी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही रूग्णाला अडवण्यात येणार नाही
हस्तांतरण कार्यक्रमापूर्वी काहीजणांनी आरोप केला की कार्यकर्त्यांसाठी सेंटर उभे केले आहे. मात्र, अशा स्थितीत असे आरोप हे दुदैवी आहेत. वास्तविक या सेंटरचे नियंत्रण जिल्हा रुग्णालयाकडे असणार आहे. कोणत्या रुग्णाला दाखल करायचे, याचा निर्णय रुग्णालयच घेणार आहे. जिल्ह्यातून कोठूनही रुग्ण आला तरी येथे अडवण्यात येणार नसल्याचे आ. शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |