08:13pm | Jan 22, 2022 |
सातारा : गेल्या तीन दिवसापासून कोरोना बाधित संख्येचा आलेख स्थिर राहिल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात बाधितांचा संक्रमण दर 29 टक्क्यावर कायम आहे. दरम्यान जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 1540 बाधित रुग्ण आढळले असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.
गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ कोरोनाशी सामना करत असतानाच आता ओमायक्रॉन संक्रमणाने डोके वर काढले आहे. त्यामुळे प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा मोठया प्रमाणावर बाधित झाल्याने रुग्णसेवेवर प्रचंड ताण पडला आहे .
बाधित रुग्णांचा प्रसार रोखण्यासाठी व गैरसोय टाळण्यासाठी तालुकानिहाय कोरोना केअर सेंटर सुरु केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी जास्तीत जास्त नागरिकांच्या कोरोना चाचण्या करुन मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न करत आहेत. तसेच हॉटस्पॉट झालेल्या ठिकाणी उपाययोजना आखण्यात भर दिला जात आहे. याचबरोबर जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. प्रशासकीय व खासगी कार्यालयांमध्ये नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 5245 चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामधील 1540 बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
सदरबझार येथून २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास |
सराईत चोरट्याकडून दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस |
सातारा जिल्ह्यातील 440 'उमेद' समूहांना 7 कोटी कर्ज वाटप |
काळाची पाऊले ओळखून उद्योग विश्वाकडे चला : हेमलता भोसले |
नांदगाव येथे वनवा लावणाऱ्यास पाच हजार रुपये दंड |
साताऱ्यात सराफी पेढी मधून महिलेचे दागिने लांबविले |
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासु-सासर्यांवर गुन्हा |
कांगा कॉलनी मध्ये वृद्धाचा अचानक मृत्यू |
सातारा शहराला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले |
ऐतिहासिक लाल महालात गाण्याचे चित्रीकरण करणाऱ्यांवर कारवाई करा |
राज्यात ओबीसी आरक्षण लागु करण्याची मागणी |
पुण्यात आढळलेली शिवकालीन नाणी साताऱ्यातील संग्रहालयात |
स्वामी समर्थ गुरुपीठ सेवेकऱ्यांची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार |
सातारा शहरातील 70 ओढ्यांच्या सफाईचे काम पूर्ण |
भविष्यकाळात भारत विश्वगुरू होऊन जगावर सत्ता गाजवेल |

देशसेवा करताना जावलीच्या सुपुत्राला वीरमरण |
जगभरात मंकीपॉक्सचे थैमान : भारतातही सरकार 'अलर्ट मोड'वर |
देशसेवा करताना जावलीच्या सुपुत्राला वीरमरण |
विजेचा शॉक लागून 23 वर्षीय युवकासह म्हैशीचा मृत्यू |
विनयभंगासह दुखापत केल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल |