सातारा : साताऱ्यात नळजोडण्याचे सर्वेक्षण करण्याच्या मोहिमेला आजपासून प्रारंभ करण्यात आला असून पंधरा ते वीस दिवसात हे काम पूर्ण होईल, अशी माहिती पाणीपुरवठा सभापती सौ. सीता राम हादगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ज्यांचे नळ कनेक्शन अधिकृत नाही, ते कनेक्शन कट करून त्यांना नळकनेक्शन अधिकृत करून घेण्याच्या सूचना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सौ. सीता हादगे पुढे म्हणाल्या, सातारा शहरामध्ये नगरपालिका मार्फत होणारा पाणीपुरवठा मध्ये १६ हजार अधिकृत नळजोडण्या असल्याची नोंद आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पासून सातारा शहरात अधिकृत नळ कनेक्शन जोडण्याचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे. प्रभाग क्रमांक १९ मधील जानकर कॉलनी येथून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागातील ४० कर्मचारी घरोघरी जाऊन नळ कनेक्शनची माहिती घेणार आहेत. मिळकतीवर त्यांचे नाव आहे का? याची शहानिशा करून नळकनेक्शन अधिकृत नळ कनेक्शन चा सर्वे करण्यात येणार आहे या सर्वांमधून नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करण्यासाठी व नगरपालिकेचा महसूल वाढविण्यासाठी हा सर्व्हे करण्यात येत असून या श्री मध्ये तुझ्या नळकनेक्शन ची नोंदणी नसेल त्या नागरिकांना माननीय नगराध्यक्षा माधवीताई कदम उपनगराध्यक्ष मनोज शेंडे पाणीपुरवठा सभापती सौ सीता हादगे यांचेकडून नळ कनेक्शन नोंद करून घेण्यास मुदत देण्यात आलेली आहे संबंधितांना पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दंडात्मक कारवाईचा बडगा उगरायचा का नाही? याबाबतचा निर्णय नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्याशी चर्चा करून घेतला जाणार आहे.
कोणी अनधिकृत नळ कनेक्शनचा वापर करून पाणी वापरत असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे येऊन नगरपालिकेला तशी कल्पना देऊन ते नळकनेक्शन तात्काळ अधिकृत करून घ्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी व प्रत्येक भागातील नळाची नोंद घेऊन ते काम पूर्ण झाल्यानंतर अनधिकृत नळजोडण्या शासकीय शुल्क अनामत रक्कम स्वीकारून ते नळ कनेक्शन अधिकृत करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका स्तरावर अभय योजना सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
8 मार्च पासून मोठ्या प्रमाणात कोविड-19 लसीकरण कार्यक्रम जिल्ह्यातील शासकीय आणि मोठ्या रुग्णालयात सुरु |
गुंड गज्या मारणेला सोपवले पुणे ग्रामीणच्या ताब्यात |
मनसे नेते राज ठाकरे हे मास्कबाबत मुख्यमंत्र्यांचा आदेश मानत नाहीत : रामदास आठवले |
कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील 65 आरोग्य केंद्र सज्ज |
जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |