06:34pm | Nov 18, 2020 |
वाई : सोमजाईनगर, वाई येथे मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी दोन गटात तुंबळ मारामारी झाली. याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले आहे.
सोमजाई नगर वाई येथे सोमवारी रात्री वीस वर्षीय मूलगी किराणा दुकानात साहित्य आणायला गेली असता तिच्या ओळखीच्या हृतिक अनिल साठे याने तिची छेड काढत विनयभंग केला. घाबरून तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. रात्री मुलीचे आईवडील हृतिकच्या घरी समजावण्यास गेले असता मुलाचे वडील अनिल साठे व हृतिक याने आईवडिलांच्या मारहाण केली. मुलीचे आई-वडील पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता पोलिसांनी मुलीस आणण्यास सांगितले. त्या युवतीला चुलता, चुलती दुचाकीवरून पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना आनंदा साठे याने गाडी आडवत पिराजी साठे, प्रकाश साठे, सूरज साठे, सागर वायदंडे यांनी भांडण काढत चुलता- चुलतीस शोभा वायदंडे व इतरांनी लाथाबुक्यांनी आणि काठीने मारहाण केली.
मुलीच्या आईवडील व चुलता चुलतीला मारहाण झाल्याचे समजताच मुलीचे नातेवाईक रॉकी निवास घाडगे, अर्जुन किरण घाडगे, कृष्णा निवास घाडगे, सनी निवास घाडगे, जॉकी निवास घाडगे, मितवा निवास घाडगे व इतरांनी ऋतिक अनिल साठे याच्या घरात घुसून प्रापंचिक सामानाची मोडतोड करत अनिल साठे, ऋतिक साठे, राजश्री साठे, सागर वायदंडे, पिराजी साठे व महिलांना जातीवाचक शिवीगाळ करत कोयता, लोखंडी रॉडने जोरदार मारहाण केली. या मारामारीत दोन्ही बाजूकडील अनेकजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही बाजूकडून परस्पर विरोधी तक्रारी पोलिसात दाखल झाल्या आहेत. माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक आशिष कांबळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ऋतिक अनिल साठे (वय १९), सागर गोरख वायदंडे (३९), पिराजी अनंत साठे (३९), रमेश नेमिनाथ गोसावी (४३), मितवा रमेश गोसावी (३६), पल्लवी रमेश गोसावी (२०) सर्वजण राहणार सोमजाई नगर यांना अटक केली असून इतर आरोपी फरारी आहेत. पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधित कायद्यान्वये (अँट्रासिटी) गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किंद्रे करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |