03:16pm | Jan 19, 2022 |
कराड : येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची रिक्त पदे भरावी, तसेच सिटी स्कॅन, एमआरआय, डिजिटल एक्सरे सारख्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे मनोज माळी यांनी अनेकदा आंदोलने केली होती. तसेच याप्रकरणी त्यांनी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला होता. याची दखल घेत उपजिल्हा रुग्णालयला भूल तज्ञ, फिजिशियन व आर्थोपेडिक डॉक्टर उपलब्ध झाले आहेत.
कराड, पाटण, कडेगाव, विटा, खटाव, इस्लामपूर (वाळवा) तालुक्यातील गोरगरीब रुग्णांसाठी वरदान असलेल्या कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात बऱ्याच महिन्यांपासून तज्ज्ञ डॉक्टरांची पडे रिक्त होती. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टर, नर्सिंग स्टाफ उपलब्ध करून याठिकाणी 200 खटांचे रुग्णालय करावे, तसेच सिटी स्कॅन मशीन, एमआरआय, ट्रॉमा केअर युनिट, डायलेसिस विभाग, डिजिटल एक्स- रे ची सुविधा सुरू व्हावी, या मागणीसाठी मनोज माळी यांनी 2017 मध्ये आमरण उपोषण केले होते. यावेळी उपसंचालकांनी माळी यांना मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने त्यांनी आंदोलन स्थगित केले. तसेच त्यानंतर मनोज माळी यांनी याप्रकरणी आरोग्य संचालक ते मंत्रालयापर्यंत नियमित पाठपुरावा केल्यानेच मागण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित मागण्यासाठी आंदोलन व पाठपुरावा सुरूच ठेवणार म्हणून मनोज माळी यांनी सांगितले.
मनोज माळी यांच्या मागणीनुसार आत्तापर्यंत उपजिल्हा रुग्णालयाला सोनोग्राफी मशीन, डिजिटल एक्स-रे डायलेसिस विभाग, गरोदर महिलांसाठी सोनोग्राफी, कायमस्वरूपी भूल तज्ञ उपलब्ध झाले आहेत. तसेच एनएचएममधून फिजिशियन व आर्थोपेडिक डॉक्टरही उपलब्ध झाले आहेत. अद्याप 200 खटांचे हॉस्पिटल, ट्रॉमा केअर युनिट, सिटी स्कॅन नवीन मशीन, रेडिओलॉजिस्टिक आदी. मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे मनोज माळी यांनी सांगितले.
आरोग्य उपसंचालकांनी आश्वासन पाळले
उपोषण मागे घेताना उपसंचालकांनी मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार डॉ. संजोग कदम यांनी काही मागण्या मार्गी लावल्या आहेत. त्यामुळे गरीब रुग्णांची चांगली सोय झाली आहे. उर्वरित मागण्यासाठी ना. बच्चू कडू व आरोग्य राज्यमंत्री यांच्यामध्ये कराड उपजिल्हा रुग्णालयबाबत लवकरच बैठक होणार आहे.
-मनोज माळी (प्रहार जनशक्ती)
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |