पुसेगाव : ग्रामपंचायतीच्या लागलेल्या निवडणूकीने सगळ्या जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. निवडणूक लागलेल्या गावात ‘मला बी सरपंच व्हायचं आहे’ म्हणून जो तो गुडघ्याला बाशिंग बांधून नाचू लागला आहे. तर गावचे नेते आपल्या गावात आपलाच सरपंच कसा होईल, ग्रामपंचायतीवर आपलाच होल्ड कसा राहील यासाठी गावगुंड्या करताना दिसत आहेत. पुसेगाव हे सुध्दा त्याला अपवाद नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री सेवागिरी महाराजांची सुवर्ण नगरी पुसेगाव ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी म्हणून सर्व सामान्य जनता गाव पुढार्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. गावाचा विकास करण्यासाठी जर सर्वच पुढारी निवडणूक लढवणार असतील तर मग पुसेगाव ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी का पुढे येत नाहीत? असा प्रश्न सामान्य मतदारांना पडला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेतील एक महत्वाचा घटक म्हणजे ग्रामपंचायत. महाराष्ट्रामध्ये सद्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे जोरदार पडघम वाजू लागले आहे. इच्छुक असणार्या आणि गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या सर्वच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरून तयारी सुरू केलेली पहावयास मिळत आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूने जगाला त्रस्त करून सोडले असतानाच, येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मात्र अजूनही सामान्य जनता उदासीन असल्याचे पहावयास मिळत आहे.कोरोनाचे सावट कायम असताना अचानक लागलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमुळे नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पळापळ सुरू झाली आहे. मात्र सामान्य जनता या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून आग्रही असल्याचे गावोगावी दिसून येत आहे. खटाव तालुका त्यालाही अपवाद राहिलेला नाही. खटाव तालुक्यातील गारवडी, भुरकवडी आदी ग्रामपंचायतीची बिनविरोधकडे होणारी वाटचाल देखील कौतुकास्पद असून त्याचे सामान्य लोकांकडून स्वागतच होत आहे.
भावकी-गावकी, गट-तट आदींच्या राजकारणात विकासकामांना देखील खीळ बसत असल्याचे चित्र अनेकवेळा पाहायला मिळते. जिरवा जिरावीच्या राजकारणात गावाच्या विकासाचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. त्यामुळे सामान्य जनतेचे नुकसान होत असते. सरपंच पदाचे असणारे आरक्षण देखील निवडणूकानंतर जाहीर होणार असल्याने सरपंच पदासाठी आग्रही राहणार्या अनेक उमेदवारांमध्ये सध्यातरी संभ्रमाचे वातावरण आहे.
खटाव तालुक्यातील महत्वाच्या असणार्या आणि श्री सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुसेगावमध्ये देखील आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुका या बिनविरोध व्हाव्यात म्हणून सामान्य जनता आग्रही असल्याचे पहावयास मिळत आहे. सध्या पुसेगाव ग्रामपंचायतीची सत्ता ही रणधीर जाधव यांच्या जनशक्ती संघटनेकडे आहे. राज्यातील महाविकास आघाडीचा परिणाम देखील पुसेगाव मध्ये पहावयास मिळत आहे. गावातील अनेक नेत्यांनी आपल्या विचारांचा उमेदवार ग्रामपंचायतीवर निवडून यावा आणि आपला वॉर्ड ताब्यात राहावा म्हणून जोरदार तयारी केलेली दिसत आहे. इच्छुक उमेदवारांच्या गर्दीत पुसेगावकारांनी घातलेल्या बिनविरोध निवडनूकीच्या हाकेला नेतेमंडळी किती प्रतिसाद देतात. हा मात्र चर्चेचा विषय आहे. खटाव तालुक्यातील पुसेगावसारखी ग्रामपंचायत गावच्या विकासाच्या दृष्टीने बिनविरोध झाल्यास एक चांगला पायंडा पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींवर नक्कीच पडेल.
गावचा सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीच्या नावाखाली एकत्र आलेल्या पुसेगावमधील सर्व जेष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन, पुसेगाव ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावकी, भावकी, हेवेदावे बाजूला सारून सर्व नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी एकत्र आल्यास जनशक्ती संघटना ग्रामपंचायत बिनविरोधसाठी स्वतः पुढे होऊन सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे.
- रणधीर जाधव
(मा.उपसरपंच पुसेगाव)
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |