12:07pm | Jul 23, 2022 |
नवी दिल्ली : भारतीय संघानं तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 3 धावांनी पराभव केला. शिखर धवनयाचं कर्णधार म्हणून पहिलं शतक हुकलं असलं तरी त्यानं दमदार खेळी करत टीम इंडियाला जबरदस्त सुरुवात करून दिली. धवनच्या या उत्कृष्ट खेळीनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला 308 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियानं प्रथम फलंदाजी करताना कॅरेबियन संघासमोर 309 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ निर्धारित 50 षटकांत 6 गडी गमावून 305 धावाच करू शकला. या सामन्यात 97 धावांची खेळी करणारा भारतीय कर्णधार शिखर धवनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. कॅरेबियन संघासाठी रोमॅरियो शेफर्ड (नाबाद 39) आणि अकील होसेन (नाबाद 32) यांनी 7व्या विकेटसाठी 53 धावा जोडून संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय संघ सामना वाचवण्यात यशस्वी ठरला. युवा सलामीवीर शुभमन गिल, दीड वर्षांनंतर एकदिवसीय संघात पुनरागमन करत आहे. त्यानंही जबरदस्त पुनरागमन केलं.
वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनच्या अचूक थ्रोवर तो धावबाद झाला. गिलचे हे वनडे क्रिकेटमधील पहिले अर्धशतक होते. त्याचबरोबर केवळ एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या धवननं आपल्या डावात 10 चौकार आणि तीन षटकार मारले. भारत एकेकाळी 350 धावांचा टप्पा ओलांडू पाहत होता. पण, धवन नर्व्हस नाईंटीला बळी पडल्याने मधली फळी कोलमडली. धवन कारकिर्दीत सातव्यांदा 'नर्व्हस नाइंटी'चा बळी ठरला आहे.
भारताची धावसंख्या एका विकेटवर 213 होती. ती पाच बाद 252 अशी झाली. संजू सॅमसनने पुन्हा एकदा सुवर्णसंधी गमावली आणि तो 12 धावा करून बाद झाला. त्याचवेळी सूर्यकुमार यादवला (13) खराब शॉट खेळण्याचा फटका सहन करावा लागला. दीपक हुडाने 27 आणि अक्षर पटेलने 21 धावा केल्या आणि सहाव्या विकेटसाठी 42 धावा जोडून भारताला 300 धावांच्या पुढे नेले.
धवनचं शतक हुकलं
शुभमन गिलनं 64 धावा करून पुनरागमन केलं तर कर्णधार शिखर धवनचं शतक तीन धावांनी हुकलं. पण, या जोडीनं शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताला 7 बाद 308 धावा केल्या. डिसेंबर 2020 नंतर पहिला एकदिवसीय सामना खेळणाऱ्या गिलनं 52 चेंडूत 64 धावा केल्या तर धवननं 99 चेंडूत 97 धावा केल्या. श्रेयस अय्यरनं 57 चेंडूत 54 धावा केल्या. धवन आणि गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 106 चेंडूत 119 धावांची भागीदारी केली. गिल 18व्या षटकात धावबाद झाला. पण, त्यानं आपल्या डावात अनेक आकर्षक शॉट्स मारले. त्यानं अल्झारी जोसेफला षटकार ठोकला आणि त्यानंतर शानदार चौकार मारला. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |