02:00pm | Sep 27, 2021 |
सातारा : रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व इतर महामार्गावरील अपघात कमी करणे, वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करुन रस्ता सुरक्षा साध्य करण्यासाठी राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयासह वाहतूक व महामार्ग विभागाने नियमभंग करणार्या वाहनचालकांविरोधात मोहिम राबविली.
याबाबत अधिक माहिती अशी, संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, सातारा या समितीचे अध्यक्ष सातारा लोकसभा मतदार संघाचे खा. श्रीनिवास पाटील व सातारा जिल्हाधिकारी हे समितीचे सचिव आहेत. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व इतर महामार्गावरील अपघात कमी करणे, वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करुन रस्ता सुरक्षा साध्य करण्यासाठी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 26 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न झाली होती.
या बैठकीमध्ये रस्त्यावरील वाढत्या अपघातांची संख्या व त्यानुषंगाने राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करुन बेदरकारपणे चालणारी वाहने, महामार्गावरील बेशिस्त वाहतूक, इत्यादी बाबींवर मोटार वाहन कायद्यांतर्गत मोटार वाहनांवर कारवाई करुन रस्ता सुरक्षेस प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे अध्यक्षांनी सुचित केले होते. त्यानुसार या बैठकीमध्ये रस्ता सुरक्षेबाबत ‘कडक वाहन तपासणी मोहिम’ राबविणेचे निर्देश अध्यक्षांनी संबंधित विभागांना दिले.
त्यानुषंगाने संयुक्त विशेष तपासणी मोहिमेसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा अंतर्गत एकुण 5 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. या मोहिमेमध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा व कराड, जिल्हा वाहतुक विभाग व महामार्ग पोलीस विभाग यांची संयुक्त विशेष तपासणी मोहिम दिनांक 25 सप्टेंबर व 26 सप्टेंबर या कालावधीमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर राबविण्यात आली. त्यामध्ये मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार्या (खाजगी बसेस, खाजगी बसेसमधून माल वाहतूक, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, सीट बेल्ट, हेल्मेट, रिफ्लेक्टर, लेन कटिंग, विमा प्रमाणपत्र, पी.यु.सी. प्रमाणपत्र, बेदरकारपणे वाहन चालविणे, धोकादायक पध्दतीने वाहन चालविणे, विना परवाना वाहतूक, विना योग्यता प्रमाणपत्र, अवैध प्रवासी वाहतूक, ओडीसी वाहतुक व इतर) वाहनांवर कारवाई करण्यात आली.
या संयुक्त विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत विभागनिहाय पुढीलप्रमाणे कारवाई करण्यात आली. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा यांनी 247 वाहनांवर कारवाई केली. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कराड यांनी 77 वाहनांवर कारवाई केली. जिल्हा वाहतूक शाखेने नियमभंग करणार्या 424 वाहनांवर केसेस केल्या, तर महामार्ग पोलिसांनी 732 केसेस केल्या आहेत.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी या मोहिमेचे समन्वयन केले. या कार्यालयामधील श्रीमती आफ्रीन मुलाणी, सुरेश माळी, गजानन गुरव, योगेश ओतारी, मारुतीराव पाटील, जाकीउद्दीन बिरादार व दिग्विजय जाधव या सर्व मोटार वाहन निरीक्षक यांनी व श्रीमती सुप्रिया गावडे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कराड यांच्या नियंत्रणाखाली सागर विश्वासराव, शिरीष पोकळे, मोटार वाहन निरीक्षक या सर्वांनी संयुक्त विशेष तपासणी मोहिमेमध्ये विशेष कामगिरी केली आहे. जिल्हा वाहतूक शाखेमधील वाहतूक कर्मचारी यांनी सपोनि विठ्ठल शेलार यांच्या नियंत्रणाखाली कामकाज केले, तर महामार्ग पोलीस यांनी सपोनि दत्तात्रय गुरव यांच्या नियंत्रणाखाली कामकाज केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |