10:06pm | Jun 20, 2022 |
सातारा : महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनस्थळावरील विविध पॉइंटस आणि प्रेक्षणीय स्थळांवर फिरायला जाण्यासाठी यापुढे विद्युत ऊर्जेवरील वाहने आवश्यक असणार आहेत. या स्वरूपाचा प्रस्ताव या दोन्ही पालिकांनी तयार करुन तो अंतिम मंजुरीसाठी पर्यटन मंत्रालयात पाठवला आहे. फक्त विद्युत उर्जेवर चालणाऱ्या वाहनांना विविध पॉइंटस आणि प्रेक्षणीय स्थळांवर फिरायला जाण्यासाठी परवानगी राहील, असा अव्यवहार्य प्रस्ताव राज्याच्या पर्यटन विभागाकडे सादर केल्याने ही नस्ती उठाठेव असल्याची चर्चा असून दोन्ही मुख्याधिकाऱ्यांनी पाचगणी, महाबळेश्वर बेसुमार वृक्षतोडीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर व पाचगणी ब्रिटीश काळापासून पर्यटकांना आकर्षित करत आहे. ब्रिटिशांनी महाबळेश्वर, पाचगणी ही उन्हाळी राजधानी केली होती. तेव्हापासून देशविदेशातील कोट्यवधी पर्यटकांनी महाबळेश्वर, पाचगणीला भेट दिली आहे. गत दोन वर्षात कोरोना संसर्गाचा मोठा फटका पाचगणी, महाबळेश्वरमधील व्यापाऱ्यांसह सर्वांनाच बसला आहे. त्यातून आता काही महिन्यांपासून राज्यभरातील कोरोना निर्बंध हटवण्यात आल्यानंतर पाचगणी, महाबळेश्वर देखील यावर्षी पुन्हा बहरले आहे.
उन्हाळ्यातील यावर्षीचा पर्यटन हंगाम पाचगणी व महाबळेश्वरवासियांना बरा गेला आहे. पर्यटकांची वर्दळ चांगली वाढल्याने पुन्हा पाचगणी व महाबळेश्वर बहरत असताना आता पावसाळ्यातील पर्यटनाची ओढ सर्वांनाच लागलेली असते. उन्हाळ्यात तर पाचगणी, महाबळेश्वर हाऊसफुल्ल असते तर थंडी व पावसाळ्यात देखील महाबळेश्वरमध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांची चांगली गर्दी होत असते. मोठया प्रमाणात जंगल व गर्द झाडी हाच हिरवागार निसर्ग पाचगणी, महाबळेश्वराची खरी श्रीमंती आहे. तर पावसाळ्यात डोंगर दऱ्यातून वाहणारे निर्झर खऱ्या अर्थाने पर्यटकांना स्वर्ग सुखाची अनुभुती देत असतात.
याच पाचगणी व महाबळेश्वरला इको-सेन्सेटिव्ह झोन जाहीर केले असून तिथे पर्यावरणाच्या दृष्टीने काळजी घेण्यासाठी प्रशासनाकडून नियमावलीही जाहीर केलेली आहे. त्यानुसार वाटचाल करताना पाचगणी व महाबळेश्वर परिसरातील सर्व परिसरांचा विकास पर्यावरणाची हानी होवू अशी काळजी घेवून केला जातो. मात्र, त्याच पाचगणी व महाबळेश्वरात शासनाच्या भाडेपट्टीवर दिलेल्या जागेत विनापरवानगी हेलिकॉफ्टर लँड व टेकऑफ होते अशा गंभीर घटनेत नियमभंग करणाऱ्यांना अभय दिले जाते तर दुसरीकडे वनविभागाच्या आणि पाचगणी, महाबळेश्वर पालिकेसह पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करुन मोठ्या प्रमाणावर नवीन बांधकामासाठी वृक्षतोड केली जाते.
या गोष्टी पर्यावरणाच्या दृष्टीने हानीकारक असतानाच आता महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेतील मुख्याधिकारी पल्लवी भोरे-पाटील यांनी पाचगणी व महाबळेश्वर पर्यटनस्थळावरील विविध पॉइंटस आणि प्रेक्षणीय स्थळांवर फिरायला जाण्यासाठी यापुढे विद्युत ऊर्जेवरील वाहने आवश्यक असणार आहेत. फक्त विद्युत उर्जेवर चालणारी वाहनांनाच परवानगी देण्याबाबत प्रस्ताव पाठवून पाचगणी व महाबळेश्वर पालिकांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.
काय आहे हा नवीन प्रस्ताव?
महाबळेश्वर, पाचगणी येथे रोज येणाऱ्या इंधनावरील शेकडो वाहनांमुळे येथे वाहतूक कोंडी तर होतेच शिवाय यामुळे होणाऱ्या वायुप्रदूषणामुळे येथील निसर्गालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. याचाच विचार करत महाबळेश्वर, पाचगणी या दोन्हीही नगरपालिकांच्या वतीने या पर्यटनस्थळी आल्यानंतर स्थानिक पर्यटनासाठी केवळ विद्युत वाहनांना परवानगी देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार येथे पर्यटक आपली पेट्रोल-डिझेलवरील वाहनांनी महाबळेश्वर, पाचगणीमध्ये येऊ शकतील. मात्र ही वाहने त्यांना येथेच वाहनतळावर लावावी लागतील. महाबळेश्वर, पाचगणी या निसर्गरम्य स्थळांच्या पर्यावरण संरक्षणासाठी हा प्रस्ताव तयार केला आहे. येथे फिरण्यासाठी पर्यटक किंवा असे व्यवसाय करणाऱ्यांकडे विद्युत ऊर्जेवर चालणारे वाहन आवश्यक असणार आहे. हा प्रस्ताव पर्यटन विभागाकडे सादर करण्यात आला आहे.
पर्यटकांची मोठी अडचण होणार
यासंदर्भात अधिक माहिती घेतली असताना डिझेल, पेट्रोल, तसेच सीएनजी उर्जेवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत विद्युत उर्जेवरील चालणारी वाहनांची टक्केवारी अगदीच नगण्य आहे. वाहन उद्योगातील जाणकारांकडून यावर अधिक माहिती असता इलेक्ट्रीकल वाहन अद्याप विकसनशील अवस्थेत आहेत. एकदा चार्जिंग केल्यानंतर ही वाहने 300 ते 400 कि. मी. अंतर चालू शकतात असा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र ही वाहने 100 ते 150 कि. मी. अंतर गेल्यानंतर डिस्चॉर्ज होतात. अशा अनेक घटना देशभरात अनेक ठिकाणी घडल्याने या वाहनांबद्दलची विश्वासहर्ता कमी झालेली आहे. त्यामुळे पाचगणी व महाबळेश्वरातील पाँईट व प्रेक्षणीय स्थळे इलेक्टीकल वाहने नसतील कशी पहायची याची मोठी अडचण निर्माण होणार आहे.
विद्युत वाहनांचा प्रस्ताव अव्यवहार्यच
पुढील भविष्य विद्युत वाहनांचेच असणार आहे. मात्र, सध्या तरी विद्युत उर्जेवर चालणारी वाहने डेव्हलपमेंट फेज अर्थात विकसनशील अवस्थेत असल्याने यासाठी प्रत्येकानेच विद्युत वाहनांच्या खरेदीबाबत थोडा विचार करुन निर्णय घेतला पाहिजे, असे जाणकारांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पाटील यांनी मात्र जिल्हाधिकारी तसेच इतर विभागाच्या अधिकाऱ्यांशी सल्लामसलत न करता महाबळेश्वरात प्रेक्षणीय स्थळांवर अन्य वाहनांवर बंदीचा प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, पाचगणी व महाबळेश्वरपर्यंत येईपर्यंत इंधनावर चालणारी वाहने आणि महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनस्थळावरील विविध पॉइंटस आणि प्रेक्षणीय स्थळांवर फिरायला जाण्यासाठी यापुढे विद्युत ऊर्जेवरील वाहने आवश्यक असणार हे पर्यटकांना कसे शक्य होणार आहे. हा प्रस्ताव त्यामुळे अव्यवहार्य असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
सातारा जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या फक्त 2,328
सर्वसामान्य जरी सातारा जिल्ह्याचा विचार केला तर पेट्रोल, डिझेल व सीएनजीवर चालणाऱ्या दुचाकी, तिचाकी, फोर व्हिलर वाहनांची एकूण वाहन संख्या 9 लाख 1 हजार 363 एवढी आहे. तर जिल्ह्यात एकूण इलेक्ट्रिक वाहन संख्या फक्त 2 हजार 328 एवढीच आहे. याचाच अर्थ इलेक्ट्रिक वाहने वापरणारांची संख्या अगदी नगण्यच आहे. हेच राज्याचे व देशाचे प्रमाण काढले तरी सर्वत्रच इलेक्ट्रिक वाहने वापरणारांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे.
पर्यटकांनी विविध पॉइंटस, प्रेक्षणीय स्थळे कशी पहायची ?
महाबळेश्वरच्या व पाचगणीच्या मुख्याधिकाऱ्यांनी विविध पॉइंटस आणि प्रेक्षणीय स्थळांवर फिरायला जाण्यासाठी यापुढे विद्युत ऊर्जेवरील वाहने आवश्यक असणार आहेत. या स्वरूपाचा प्रस्ताव या दोन्ही पालिकांनी तयार करून तो अंतिम मंजुरीसाठी पर्यटन मंत्रालयात पाठवला आहे. मात्र, जर इलेक्ट्रिक्स वाहनेच पर्यटकांकडे नसतील त्यांनी विविध पॉइंटस, प्रेक्षणीय स्थळे कशी पहायची ? पर्यटक हे महाबळेश्वर, पाचगणीच्या विविध पाँईटसवर असलेला निसर्ग सौंदर्याचा अनोखा अविष्कार अनुभवण्यास येत असतात. मात्र, अशा प्रकारे प्रस्ताव जर मंजूर झाला तर त्याचा मोठा फटका पाचगणी, महाबळेश्वरच्या पर्यटनास बसू शकतो, असे पाचगणी, महाबळेश्वरमधील अनेकांचे म्हणणे आहे.
पाँईट पाहण्यासाठी इलेक्टिक वाहने कोणाकडे आहेत ?
मुळात देशविदेशातून येणारे पर्यटक हे त्यांच्या खासगी वाहनातून पाचगणी व महाबळेश्वरात येत असतात. आल्यानंतर ते त्यांच्याच गाडीतून वा पाचगणी, महाबळेश्वरात असलेल्या टुरिस्ट टॅक्सी चालकांच्या माध्यमातून विविध पाँईटस व प्रेक्षणीय स्थळे पहात असतात. जर विविध पॉइंटस, प्रेक्षणीय स्थळे यावर फक्त इलेक्टिक वाहनांची सक्ती केली तर त्याचा फटका गरीब टॅक्सी चालकांना बसणार आहे. प्रत्येक पर्यटकाकडे इलेक्ट्रिक वाहने नाहीतच मग हा प्रस्ताव कसा व्यवहार्य ठरणार ? असाही सवाल पर्यटकांसह नागरिकांच्या मनात आहे.
इलेक्ट्रिक वाहनांची मोफत सुविधा पुरवणार आहात का ?
महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनस्थळावरील विविध पॉइंटस आणि प्रेक्षणीय स्थळांवर फिरायला जाण्यासाठी यापुढे विद्युत ऊर्जेवरील वाहने आवश्यक असणार आहेत. असा प्रस्ताव पाठवणाऱ्या पाचगणी, महाबळेश्वर पालिकेने जर पर्यटकांकडे इलेक्ट्रिक वाहन नसेल तर त्यांना विविध पॉइंटस व प्रेक्षणीय स्थळांवर फिरायला जाण्यासाठी मोफत इलेक्ट्रिक वाहनांची सुविधा पुरवण्याची जबाबदारी घेतलेली आहे का ? असाही प्रश्न नागरिक विचारत असून असे करणार नसला तर हा प्रस्ताव सध्या बासणात गुंडाळून ठेवा, अशीही मागणी नागरिक व पर्यटकांमधून होत आहे.
कंपनी सचिवांच्या सल्ला, मार्गदर्शनाशिवाय कंपन्या काम करु शकणार नाहीत |
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत भरतनाना पाटील यांना संधी द्यावी |
'आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात' |
साताऱ्यात १७ जुलै रोजी मोफत 'जयपूर फूट' शिबीर |
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा |
फिरते लोकन्यायालय मोबाईल व्हॅनचा प्रमुख शुभारंभ |
श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालयात 8 जुलै रोजी मोफत कोरोना लसीकरण |
श्री सेवागिरी महाराजांच्या पायी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान |
अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाची निवड रद्द करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही |
भास्कर जाधव यांच्या आक्रमक टीकेनंतर सभागृहात चांगलाच गोंधळ |
चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे आणि संजय राऊत तयार |
शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फुटीची चिन्हे ? |
काही लोक पक्ष सोडून गेले म्हणून शिवसेना संपली नाही |
नटराज मंदिर परिसरातील खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात |
बहुमत चाचणीवेळी शिंदे-फडणवीस सरकारला काँग्रेस-राष्ट्रवादीची 'अदृश्य'मदत |
फिरते लोकन्यायालय मोबाईल व्हॅनचा प्रमुख शुभारंभ |
श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालयात 8 जुलै रोजी मोफत कोरोना लसीकरण |
श्री सेवागिरी महाराजांच्या पायी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान |
अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाची निवड रद्द करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही |
भास्कर जाधव यांच्या आक्रमक टीकेनंतर सभागृहात चांगलाच गोंधळ |
चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे आणि संजय राऊत तयार |
शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फुटीची चिन्हे ? |
काही लोक पक्ष सोडून गेले म्हणून शिवसेना संपली नाही |
नटराज मंदिर परिसरातील खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात |
बहुमत चाचणीवेळी शिंदे-फडणवीस सरकारला काँग्रेस-राष्ट्रवादीची 'अदृश्य'मदत |
एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारचा विजयी झेंडा |
कोयनेच्या त्यागातून लाभला महाराष्ट्राला मुख्यमंत्री |
केदारेश्वर महाराज कोरेगाव दिंडीचे वर्धनगड येथे उस्फूर्त स्वागत |
विठुरायाच्या महापूजेनंतर दुसऱ्या दिवशी सरकार राहणार नाही |
शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त |