सातारा : हुतात्म्यांची भूमी असा नावलौकिक असलेल्या खटाव तालुक्यातील वडूज पोलीस ठाण्याच्या नुतन इमारतीचे उद्रघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार दि. २५ रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. या उदघाटनासाठी पोलीस दल सज्ज झाले असून, मान्यवरांचे स्वागत व बंदोबस्तसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पूर्वसंध्येला जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नूतन पोलीस ठाण्याची पाहणी करून उपयुक्त सूचना केल्या.
सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय यांनी दि.३ फेब्रुवारी २०१४ रोजी नुतन पोलीस ठाण्याच्या सुसज्ज इमारतीला प्रशासकीय मंजुरी मिळाली. तसेच २ कोटी ९४ लाख २८ हजार ४८८ इतका रुपये निधी मंजूर झाला. या पोलीस ठाण्याअंतर्गत साठ गावांचा समावेश आहे. दोन पोलीस अधिकारी व ५५ अंमलदार असे एकूण १ लाख ३२ हजार लोकसंख्या वडूज पोलीस ठाण्याअंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणार आहेत. एकूण १७ कक्ष या नवीन ग्रीन पोलीस ठाण्यात आहेत.
उदघाटनाच्या पूर्व संध्येला सातारा जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, बाळासाहेब भरणे, किशोर धुमाळ, महेश इंगळे, कामेश कांबळे, संदीप मोरे, स्वाती पवार यांच्यासह वडूज पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी मालोजीराव देशमुख, पोलिस उपनिरीक्षक शितल पालेकर, पोहवा, संदीप शेडगे, आण्णा मारेकर, दीपक देवकर, राहुल सरतापे, यांच्यासह पोलिस कर्मचारी परिश्रम घेत आहेत. वडूज नगरीमध्ये सुसज्ज पोलिस ठाणे होत असल्याने चैतन्याचे वातावरण पसरले आहे. वडूज नगरीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, पोलीस कोठडी मधील सुरक्षा बाबत एक मोठी खिडकी असावी अशी सूचना केली जात आहे. त्याची अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |