12:58pm | May 23, 2020 |
पुसेगाव : वीज महावितरणने 12 मे 2020 रोजी काढलेल्या परीपत्रकानुसार एक एप्रिल 2019 नंतर कार्यान्वित झालेली राज्यातील 91 वीज उपकेंद्रे खाजगी ठेकेदारांमार्फत चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील कालगाव व किन्हई या उपकेंद्रांचा त्यात समावेश आहे. या खाजगीकरणाच्या निर्णयास वीज कर्मचारी संघटनांसह महाराष्ट्र राज्य विद्युत आँपरेटर्स संघटनेने तीव्र विरोध केला आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर्स संघटनेचे कार्याध्यक्ष सुधीर इंगळे यांनी सांगितले, राज्यातील 91 सबस्टेशनमध्ये आता ऑपरेटर म्हणून कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त होणार नसल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे. उपकेंद्र निर्माण झाल्यानंतर तेथे एक वरिष्ठ यंत्रचालक किंवा प्रधान यंत्रचालक व तीन यंत्रचालक पदाच्या मंजूरीचे आदेश महावितरण मुख्यालय काढत असते. परंतु एक एप्रिल 2019 नंतर कार्यान्वित झालेल्या राज्यातील 91 उपकेंद्रातील यंत्रचालकांचे आदेश आजपर्यंत काढलेले नव्हते. या परिपत्रकानुसार नुसार 91 उपकेंद्रे या खाजगी ठेकेदारांमार्फत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या उपकेंद्रात काम करण्याची इच्छा असूनही कायमस्वरूपी यंत्रचालकास पदोन्नती अथवा बदली मिळण्याचे पर्याय बंद झाले आहेत. वास्तविक पाहता महावितरणची उपकेंद्रे ही खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम विश्वासार्हपणे करीत असतात. या सुरक्षिततेवरच तंत्रज्ञ आपल्या गावातील दोष दुरुस्तीची कामे करीत असतात. अशा या ठिकाणांचे संचलन खाजगी ठेकेदारांच्या मार्फत करण्याच्या निर्णयावर विविध संघटनांसह महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर्स संघटनेने विरोध केला आहे. वीज महामंडळचे विभाजन करताना यंत्रचालक संवर्गाचा पदोन्नतीचा मार्ग बंद झाला होता. आता नवीन उपकेंद्रे खाजगी ठेकेदारांच्याकडे दिल्यानंतर महावितरणच्या यंत्रचालकांवर पुन्हा अन्याय होणार आहे. महावितरणची कोट्यावधीची मालमत्ता खाजगी लोकांच्या हाती जाऊन, या मालमत्तेची हाताळणी, दुरुस्ती, सुरक्षित संचालन यांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. पुर्वी जीटीएलकडून ग्राहकांना जसे वाईट अनुभव आले तशाच समस्या पुन्हा उदभवू शकतात असे सुधीर इंगळे यांनी सांगितले. त्यामुळे महावितरण व महापारेषणमधील यंत्रचालकांच्या वेतनातही मोठा फरक पडला होता. कोट्यावधी रुपये खर्च करून उभारणी केलेली उपकेंद्रे खाजगी ठेकेदारांमार्फत न चालविता कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांकडूनच त्यांचे संचलन होणे गरजेचे असल्यामुळे कंपनीने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करून परिपत्रक रद्द करण्याबाबतची मागणी सर्व संघटनांनी केली आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |