11:43pm | Aug 09, 2020 |
सातारा : रविवारी 126 संशयित नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच जिल्ह्यातील विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 62 नागरिकांना आज डिस्चार्ज देण्यात आला, तर 336 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
जिल्ह्यातील कोरोना साखळी तुटता तुटेना, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. रविवारी 126 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 5765 झाली आहे. तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 174 झाली आहे. रविवारी 62 नागरिकांना डिस्चार्ज दिल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या 2677 झाली आहे.
बाधित नागरिकांमध्ये पाटण तालुक्यातील पापर्डे येथील 30 वर्षीय पुरुष, सणबुर 35 वर्षीय महिला., खंडाळा तालुक्यातीलशिरवळ येथील 14 वर्षीय युवती, मोरवे येथील 35, 33 वर्षीय पुरुष, निप्रो इंडिया कार्पोरेशन शिरवळ येथील28, 62 वर्षीय पुरुष., सातारा तालुक्यातीलसातारा शहरातील लक्ष्मीटेकडी येथील 45 वर्षीय पुरुष, कामाठीपूरा 40 वर्षीय महिला., खटाव तालुक्यातील मांडवे येथील 32 वर्षीय महिला व 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच इतर 115 नागरिकांचा विस्तृत तपशील उद्या जाहीर करणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
3 बाधितांचा मृत्यू
क्रांतीतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे सुरुर ता. वाई येथील 75 वर्षीय महिला, पाटण ता. पाटण येथील 55 वर्षीय पुरुष व विकासनगर, सातारा येथील 61 वर्षीय पुरुष या 3 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
336 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 27, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 9,शिरवळ-खंडाळा येथील 46, रायगाव येथील 22, पानमळेवाडी येथील 125, मायणी येथील 41, महाबळेश्वर येथील 4, खावली येथील 62 असे एकूण 336 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
62 नागरिकांना आज डिस्चार्ज
डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावळी तालुक्यातील दुदुस्करवाडी येथील 7 पुरुष,11 महिला, 2 युवक व 2 युवती., खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 1 पुरुष., पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील 1 पुरुष., सातारा तालुक्यातील कुस येथील 2 महिला, गोडोली येथील 2 पुरुष व 1 महिला, शेंद्रे येथील 1 महिला, सातारा येथील 1 महिला, कण्हेर येथील 3 महिला 4 पुरुष व 2 बालक, सातारा शहरातील शनिवार पेठेतील 1महिला व 1 बालक, रामकृष्णनगर सातारा येथील 3 पुरुष व 3 महिला,अमरलक्ष्मी सोसायटी संभाजीनगर येथील 1 पुरुष, कारी येथील 1 पुरुष., वाई तालुक्यातील परखंदी येथील 1 बालक, शेंदुरजणे येथील 2 महिला व 1 बालक, शाहबाग येथील 1 महिला, वाई शहरातील रविवार पेठेतील1 पुरुष व 1 महिला., खटाव तालुक्यातील उंबर्डे येथील 1 पुरुष., माण तालुक्यातील दहिवडी येथील 2 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |