01:33pm | Aug 12, 2020 |
बंगलुरू: एका आक्षेपार्ह फेसबुक पोस्टवरून बेंगळुरूमध्ये हिंसाचार उफाळला. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेत पोलीस स्टेशनला आग लावण्यात आली. या जाळपोळीत 2 जणांचा मृत्यू झाला तर 60 हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत. यामध्ये अतिरिक्त पोलिस आयुक्तांचा समावेश आहे.
शहरातील डीजे हल्ली आणि केजी हल्ली पोलिस स्टेशन भागात हिंसाचार झाला. सध्या येथे कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण बंगळुरूमध्ये कलम 144 लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत 110 लोकांना अटक करण्यात आली आहे.
असा आरोप केला जात आहे की, काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांचे पुतणे नवीन यांनी एका विशिष्ट समुदायाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली. यामुळे समाजातील लोक संतापले. आयुक्त कमल कांत म्हणाले की, आरोपी नवीनला अटक करण्यात आली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, हिंसाचारग्रस्त भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. उपद्रवी व्यक्तींवर कारवाई केली जाईल.
काँग्रेसचे आमदार मूर्ती यांच्या घराची तोडफोड करुन बाहेर जाळपोळ करण्यात आली. गाड्यांना आग लावण्यात आली. आमदारांनी लोकांना हिंसाचार करु नये असे आवाहन केले. मी लोकांना आवाहन करतो की काही उपद्रवी लोकांच्या चुकांमुळे आपण हिंसाचारास भाग घेऊ नये, असे त्यांनी व्हिडिओ संदेशात सांगितले.
यासंदर्भात काँग्रेस आमदाराच्या पुतण्याने स्पष्टीकरण सादर केले आहे. त्याचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे त्याने सांगितले. त्यांनी कोणत्याही धर्मावर भाष्य केलेले नाही. आमदार मूर्ती यांनी पुतण्याच्या बचावात निवेदनही दिले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |