12:44pm | Dec 08, 2020 |
पुसेगाव: नेर धरणातून पाणी सोडण्यासाठी असलेला कालवा पुसेगाव-सातारा रस्त्यालगत पुसेगाव हद्दीतील श्री.देशमुख यांच्या शेताजवळ फुटला आहे. या कालव्याच्या दुरूस्तीस दोन दिवसांत प्रारंभ न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रताप जाधव यांनी दिला आहे.
नेर धरणातून पाणी सोडण्यासाठी असणारा कालवा तीन चार महिन्यांपूर्वी पावसाच्या पाण्याने वाहून गेला आहे. परंतु अद्याप त्याची काहीही डागडुजी करण्यात आलेली नाही. या कालव्याद्वारे परिसरातील किमान अडीच हजार क्षेत्र ओलिताखाली येते. सध्या सर्व पिकांना पाण्याची गरज असून धरणात मुबलक पाणी आहे. तरीही पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी गांधारीची भुमिका घेतल्याने शेतकर्यांनी वारंवार मागणी करूनही या कालव्याची डागडुजी केली जात नाही. या डागडुजीसाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागेल अशी परिस्थिती असूनही कोणतीच हालचाल होत नाही.
गेल्या आठवड्यात पालकमंत्र्यांनी आदेश दिल्याने खटाव तालुक्याच्या दक्षिण भागातील काही क्षेत्र ओलिताखाली आले. परंतु फुटलेल्या कॅनॉललगतचा भाग अजूनही वंचित आहे, असे नमूद करून प्रताप जाधव म्हणाले, राजकीय नेतेमंडळी कायमच शेतकर्यांच्या प्रश्नाकडे उदासीन असतात. केवळ मतांचा विचार न करता या प्रश्नाकडेही जातीने लक्ष घालावे, असे आवाहन श्री.जाधव यांनी केले.दरम्यान येत्या 10 ते 15 दिवसात सर्व पिकांना पाणी मिळणे गरजेचे आहे. पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे पिके नष्ट होण्याची शक्यता असल्याने दोन दिवसात या कामाकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरले. यावेळी पुसेगाव शहर प्रमुख आकाश जाधव व प्रताप जाधव यांनी पडलेल्या कामाची पाहणी केली.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |