08:40pm | Jan 12, 2022 |
कराड : कराड शहरासह तालुक्यातही हळूहळू कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. नुकतेच कराडचे तहसीलदार विजय पवार यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे तहसील कार्यालयात खळबळ उडाली असून कार्यालयातील सर्व कर्मचार्यांची कोरोना टेस्ट सूरू करण्यात आली. त्यामध्ये नायब तहसिलदार आनंदराव देवकर यांचीही टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली असून त्यांच्यासह अन्य सहा जनही पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयातील कर्मचारी धास्तावले आहेत.
तहसीलदार विजय पवार यांची सोमवारी 10 रोजी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर नगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने मंगळवारी 11 रोजी तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये नायब तहसिलदार आनंदराव देवकर यांचीही टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. तसेच त्यांच्यासह तहसील व प्रांत कार्यालयातील मोरे, संकपाळ, गुलानी आदींसह अन्य ३ कर्मचाऱ्यांची टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तहसील व प्रांत कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, नगरपालिकेचे नागरी आरोग्य केंद्र व आरोग्य विभागाच्या वतीने तहसील व प्रांत कार्यालय पूर्णपणे सॅनीटराईज करण्यात आले आहे. तसेच या दोन्ही कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही कोरोना टेस्ट करण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर कराड, मलकापूरसह तालुक्यात वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह रेटच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले असून नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |