08:47pm | Aug 11, 2022 |
पुसेगाव : शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे व ते पिल्यावर विद्यार्थी गुरगुल्याशिवाय राहणार नाही, असं म्हटलं जाते. मात्र सर्व सोयींनीयुक्त शाळेची प्रशस्त इमारत असून देखील पुरेशा शिक्षकांच्या अभावामुळे शिक्षणच मिळत नसेल तर त्यांनी काय करायचे व जाब कोणाला विचारायचे, असा प्रश्न खटावच्या पश्चिमेला असलेल्या गादेवाडीच्या ग्रामस्थांना पडला आहे. लोकसहभागातून व अथक परिश्रमाने येथील जिल्हा परिषद शाळेचे सुमारे ६० लाख खर्चून उर भरून येईल असे रुपडे पालटले आहे. मात्र अपूरे शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याचा आरोप पालक वर्ग करत आहे.
खटावच्या पश्चिमेला दुर्गम भागात वसलेल्या गादेवाडी येथे जिल्हा परिषदेची शाळा असून ही शाळा पहिली ते सातवी पर्यंत आहे. मात्र सात वर्गांसाठी केवळ इनमिन तीन शिक्षक असून त्यातही शैक्षणिक कामकाजासाठी एका शिक्षकाचा वेळ तालुक्याच्या ठिकाणी जात असल्यामुळे दोनच शिक्षकांना सात वर्ग शिकवण्याची कसरत करावी लागते. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे त्यातला एक शिक्षक आपला बहुतांश वेळ मोबाईलमध्येच घालवत असून मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होत आहे. त्याचप्रमाणे सबंधित शिक्षक हे बऱ्याचदा शाळा भरल्यानंतर अर्धा ते पाऊण तास उशिरा शाळेत पोहोचत असल्याचा आरोप येथील पालक वर्ग करत असल्याने संबधित विभागाने लक्ष घालून समस्येचे निराकरण करावे, अशी मागणी पालक करीत आहेत.
एक काळ गावाला शाळेची इमारत नव्हती. गावाला अगदी अवकळा आली होती. गावातील चिमुकल्यांना दोन-दोन किलोमीटर बाहेर गावच्या शाळेत पायपीट करावी लागत होती. येथील संवेदनशील चाकरमानी व व्यावसायिकांच्या ही बाब लक्षात येताच शाळेची नव्याने उभारणी करण्याचा संकल्प करण्यात आला व काही काळातच ६० लाखांची टुमदार इमारत उभी राहिली. मात्र एवढी भारदस्त इमारत होऊन शाळेचा दर्जा कमालीचा घसरत चालल्यामुळे आपल्या मुलांचं उज्ज्वल भवितव्य चिंतणारे पालक आपल्या मुलांना दुसऱ्या गावातील शाळेत दाखल करू लागले आहेत. आजच्या घडीला पहिली ते सातवी पर्यंत केवळ ४२ विद्यार्थीच एवढ्या मोठ्या शाळेत राहिल्याचे येथील ग्रामपंचायत सदस्य बाबुराव जाधव यांनी सांगितले.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |