12:58pm | Jul 11, 2020 |
नवी दिल्ली : संपूर्ण जगाला भेडसावणार्या प्लॅस्टिक कचर्याची सध्या अनोख्या पध्दतीने विल्हेवाट लावली जात आहे. यामुळे प्लॅस्टिक कचर्याच्या समस्येतून मुक्ती तर मिळतच आहे परंतु त्याचबरोबर आर्थिक बचतही होत आहे. अनोख्या संकल्पनेची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 2016 मध्ये केली होती.
केंद्र सरकारने शोधलेल्या या अनोखा मार्गामुळे आतापर्यंत असे एक लाख किलोमीटर लांबीचे रस्ते बनविण्यात आले आहेत. त्यामुळे प्लास्टिकच्या कचर्याची विल्हेवाट लावणारा एक उत्तम मार्ग उपलब्ध झाला आहे. अशा प्रकारच्या रस्त्यांमुळे खर्चात काही प्रमाणात बचत झाली आहे.
डांबर आणि प्लास्टिक यांचे योग्य मिश्रण रस्ते बनविण्यासाठी वापरले जाते. एक किलोमीटर रस्त्यासाठी नऊ टन डांबर आणि एक टन प्लास्टिक वापरले जाते. याचाच अर्थ प्रत्येक एक किलोमीटर रस्त्यामागे एक टन डांबर वाचले आहे. अशा प्रकारे प्लास्टिकच्या वापरामुळे रस्त्यांच्या बांधकामाच्या खर्चातही मोठी बचत होत आहे.
भारतात दररोज 25,940 टन प्लास्टिक कचरा तयार होतो. यातील 60 टक्के कचरा रिसायकल होतो. बाकीचा जमिनीवरच पडून राहतो. हाच कचरा मग ड्रेनेज तुंबवतो, मायक्रो प्लास्टिकच्या स्वरूपात समुद्रात जातो. काही कचरा जाळला जातो. त्यातून वायुप्रदूषण होते. रस्ते बांधण्यासाठी प्लास्टिकचा वापर केल्यामुळे प्लास्टिक कचजयाची समस्या काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. रस्त्यांच्या बांधकामात प्लास्टिकचा वापर आणखी वाढल्यास ही समस्या कमी होईल.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |