04:13pm | Nov 27, 2022 |
सातारा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली होती. गेल्या आठवड्यात झालेल्या एका कार्यक्रमात पुन्हा कोश्यारींनी छ. शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले होते. हे कमी की काय म्हणून भाजप प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांनीसुद्धा छ. शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. त्यामुळे छ. शिवाजी महाराजांचे वंशज खा. उदयनराजे यांनी थेट पत्रकार परिषद घेत कोश्यारींसह त्रिवेदींना हटविण्याची मागणी केली होती. तसेच त्यांच्यावर कारवाई न झाल्यास 28 नोव्हेंबरला पुढील निर्णय घेण्याचा अल्टिमेटम देण्यात आला होता.
राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अनेकदा छ. शिवाजी महाराज यांच्याबद्दल जाहीर कार्यक्रमांमध्ये वादग्रस्त विधाने केल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा रोष ओढवून घेतला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये कोश्यारींनी छ. शिवाजी महाराजांची तुलना गडकरींशी केली. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. त्यामुळे छ. शिवाजी महाराजांचे थेट वंशज असलेले तसेच भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजेंनीसुद्धा कोश्यारींचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला. त्यामध्येच भाजपचे केंद्रीय प्रवक्ता सुधांशु त्रिवेदींनीसुद्धा छ. शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने खा. उदयनराजेंच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यानंतर पुण्यात थेट उदयनराजेंनी जाहीर पत्रकार परिषद घेवून राज्याचे राज्यपाल कोश्यारींसह भाजप प्रवक्ता सुधांशु त्रिवेदींच्या हकालपट्टीची मागणी केली.
यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले, सर्वधर्मसमभाव छत्रपती शिवरायांचा विचार होता. रयतेसाठी त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. सगळ्या धर्माचा, पंथांचा त्यांनी आदर केला. त्यांनी आपल्या राज्यामध्ये सामाजिक सौहार्द टिकविण्याचे काम केले. आपण कुणी देव पाहिला नाही, मात्र छ. शिवाजी महाराज हे देवापेक्षा कमी नव्हते. देश अखंड ठेवायचा असेल तर छ. शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. जर कोणी छ. शिवाजी महाराजांचा उपमर्द करीत असेल तर अशा प्रवृत्तींना ठेचून काढले पाहिजे. तसेच येत्या 27 नोव्हेंबरपर्यंत पक्षाने कोश्यारींसह त्रिवेदींवर कारवाई केली नाहीतर पक्ष बिक्ष बघणार नाही, 28 नोव्हेंबरला पुढची भूमिका जाहीर करु, असा थेट अल्टिमेटमही खा. उदयनराजेंनी भाजपला दिला होता. आज दि. 27 रोजीपर्यंत भाजपने कोश्यारी व त्रिवेदींवर कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने उद्या 28 नोव्हेंबर आहे. त्यामुळे उद्या श्री.छ. उदयनराजे काय भूमिका घेणार, याकडे सातारा जिल्ह्यासह राज्यभरातील जनतेचे लक्ष लागले आहे.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |