10:54pm | Sep 28, 2020 |
वाई : मारामारीसारख्या गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने वाई शहरात येण्यास मनाई करत जामीन दिलेला गुन्हेगार सागर भाऊराव मेश्राम (रा. गंगापूरी वाई) हा वाई शहरात आला होता. त्याला पकडून चौकशी कामी पोलीस ठाण्यात आणले असता त्याने पोलीस निरीक्षकांच्या टेबलवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
सागर भाऊराव मेश्राम (रा. गंगापूरी वाई) हा गुन्हेगाराला पोलिसांनी पकडून त्याच्यावर एक महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल केला होता. जिल्हा सत्र न्यायालय सातारा यांनी वाई शहरात येणेस बंदी घालत मनाई आदेश करुन जामिन मंजूर केलेला आरोपी सागर भाऊराव मेश्राम (रा. गंगापूरी वाई ता. वाई जि. सातारा) हा वाईमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वाई पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेशनचे जवान श्रावण राठोड व होमगार्ड प्रणित येवले यांना गस्त घालत असताना दुपारी गंगापुरी येथे फिरताना सागर आढळून आला. त्यावरून सागरला त्यांनी विचारले असता तो त्यांच्यावरच दादागिरी करू लागला. तुम्हाला काय कराचेय? कोर्ट व मी बघून घेईन' असे म्हणाला. त्यावरून त्याला वाई पोलीस ठाण्यात आणला. पोलीस निरीक्षक खोबरे यांच्या कक्षामध्ये त्यास विचारपूस करण्यास हजर केले असता त्याने गोंधळ घालत स्वतःचे डोके टेबलावर आपटले. त्याने अचानक घेतलेल्या पवित्र्याने सगळ्यांची पळापळ झाली. त्याला तेथेच असलेल्या पोलिसांनी पकडले. त्याच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे तपास करत आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |