07:38pm | Sep 13, 2021 |
देवराष्ट्रे : सध्याचा काळ कठीण आहे. आव्हानात्मक आहे. कारण पर्यावरणाचे संतुलन बिघडलंय. ॠतुमान बदललंय. ग्लोबल वार्मिंगचे परिणाम आपण भोगत आहोत. पर्यावरण बदलाने जगण्या-मरण्याचा संघर्ष सुरू आहे. म्हणूनच निसर्गाचे संवर्धन करणे आवश्यक आहे, अशी भावना पर्यावरण अभ्यासक अजित पाटील, शैलेंद्र पाटील यांनी व्यक्त केली.
देवराष्ट्रे ( ता. कडेगांव ) येथील यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात अमृतवेल ग्रामविकास प्रबोधिनी, खानापूर- कडेगाव साहित्य परिषद आणि वृक्षमित्र धों. म. मोहिते चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित पर्यावरण पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी वृक्षमित्र धों. म. मोहिते पर्यावरण पत्रकार पुरस्काराने सातारा येथील पत्रकार शैलेंद्र पाटील यांना, तर कविवर्य चंद्रकांत देशमुखे पर्यावरण स्नेही पुरस्काराने अजित उर्फ पाप्पा पाटील यांना सन्मानित केले.
भाई संपतराव पवार म्हणाले, पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. हे जरी खरे असले तरी पर्यावरण समतोलाच्या मुळाशी विकासनीतीशी संबंध आहे.
प्रारंभी स्वागत रघुराज मेटकरी यांनी केले. प्रास्ताविक धर्मेंद्र पवार यांनी केले. यावेळी प्रा. संजय ठिगळे, सुवर्णा ठिगळे यांचा सत्कार करण्यात आला. नियोजित कविवर्य चंद्रकांत देशमुखे साहित्य अकादमीच्या लोगोचे अनावरण भाई संपतराव पवार, अजित पाटील यांच्या हस्ते झाले. प्रा. विश्वनाथ गायकवाड, रानकवी सु.धों. मोहिते, प्रा. संजय ठिगळे, अनुपमा एन. व्ही. यांनी मनोगत व्यक्त केले.
मानपत्राचे वाचन दत्तात्रय सपकाळ, शांतिनाथ मांगले यांनी केले. सूत्रसंचालन दीपक पवार यांनी केले. आभार एम.बी. जमादार यांनी मानले. कार्यक्रमास जेष्ठ नेते बी. टी. महिंद, प्रा. श्रीकृष्ण मोहिते, राजाराम गरुड, सुरेश यादव, अरुण लंगोटे, अभिजीत पाटील, इंद्रजीत पाटील, प्रगती पाटील, डॉ. स्वाती शिंदे - पवार, प्रदीप सुतार, देवकुमार दुपटे, संजय निकम, सुबोध कुलकर्णी, नाना खामकर, सागर देशमुखे, मायानंद देशमुखे, प्रा. रोहित मोहिते, बाळासाहेब मोहिते, पांडुरंग मोहिते, यशवंत चव्हाण, प्रा.प्रशांत पवार, अशोक पवार, विनायक कदम, प्रवीण शिंदे, एकनाथ गायकवाड, सतीश लोखंडे, सदानंद माळी यांच्यासह पर्यावरण स्नेही तसेच वन कर्मचारी उपस्थित होते.
पुरस्काराची रक्कम चंद्रकांत देशमुखे साहित्य अकादमीला
कविवर्य चंद्रकांत देशमुखे पर्यावरण स्नेही पुरस्काराने अजित पाटील ( सांगली ) यांना सन्मानित केले. पाटील यांनी पुरस्काराची रक्कम नियोजित कविवर्य चंद्रकांत देशमुखे साहित्य अकादमीकडे सुर्पुद केले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |