03:02pm | Jun 22, 2020 |
नवी दिल्ली: रविवारी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. करोना असल्यामुळे घरातच योग करून हा दिवस साजरा करण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलं होतं. रविवारी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी ‘पीटीआय’शी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात भारतात व जगात योग प्रसार करण्यात आला. त्याचा मोठा फायदा करोनावर मात करण्यासाठी होत आहे. ज्या व्यक्ती नियमित योग करतात, त्यांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका खूप कमी आहे, असा दावा नाईक यांनी केला.
देशात करोनामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. अनलॉकचा निर्णय घेत केंद्र सरकारनं जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे काम सुरू असताना देशातील करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत असून,नियमित योग करणार्यांना व्यक्तींना करोना होण्याचा धोका खूप कमी आहे, असा दावा केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केला आहे.
नाईक यांनी पणजीजवळील त्यांच्या गावी योग दिवस साजरा केला. योग केल्यानं रोग प्रतिकारक शक्ती वाढते त्याचबरोबर श्वसन संस्थाही सदृढ होते. योगामुळे करोनासारख्या आजाराला रोखण्यासाठी मदत होते. घरी राहून योग करण्याच्या सरकारच्या आवाहनालाही लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असं नाईक यांनी सांगितलं., असं नाईक यांनी सांगितलं.
योग दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकांना योग करण्याचं आवाहन केलं होतं. करोनाचं संकट उभं राहिल्यानंतर जगाने योगाला गांभीर्यानं घेतलं आहे. त्यामुळे भारतीयांनी योगाला दैनंदिन आयुष्याचा भाग बनवावं, असं मोदी म्हणाले होते. यावर्षी योग दिनाची थीम योगा अॅट होम, योग विथ फॅमिली अशी होती.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |