06:47pm | Jul 28, 2021 |
सातारा : कूस, ता. सातारा येथील विठ्ठल मारुती लोटेकर यांच्या पत्नी अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. लोटेकर कुटुंबीयांना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाकडून पाच लाखाची मदत तातडीने मिळाली. दरम्यान, आपत्तीग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी वाट्टेल ते करू, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले. तसेच सांडवली, बोंडारवाडी रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार असल्याचेही ते म्हणाले.
कूस येथील मृताच्या कुटुंबियांना आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला. तसेच बोंडारवाडी येथील ग्रामस्थांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, तहसीलदार आशा होळकर, गट विकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, पंचायत समितीचे उपसभापती अरविंद जाधव, तालुका पुरवठा अधिकारी संतोष दळवी, विस्तार अधिकारी संदीप राक्षे, कृषी मंडलाधिकारी बबन साबळे, मंडलाधिकारी शिवाजी मोहिते, कुसच्या सरपंच शोभा लोटेकर, पोलीस पाटील लहु लोटेकर आदी उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासन एकत्ररित्या काम करीत आहे. आपत्तीग्रस्तांना शासनाकडून तातडीने मदत मिळण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. सांडवली बोंडारवाडी या गावांचा अतिवृष्टीमुळे संपर्क तुटत आहे. पांगारे, सांडवली या दोन्ही धरणाच्या सांडव्यातूनचे अति नुकसान झाले आहे. यामुळे संपूर्ण रस्ता वाहून जात आहे. यासाठी या दोन्ही धरणाच्या सांडव्यावरूनच् रिंगरोड करणे गरजेचे आहे. सांडवलीची पुनर्वसन प्रक्रिया शासन दरबारी प्रलंबित आहे. त्यांना तात्पुरती घरे बांधून मिळाली तरी गावठाण शेत जमीन हे प्रश्न कसे सुटणार? एवढी जमीन उपलब्ध होणार का? या बाबत वरीष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. पांगारे, पळसावडे लघु प्रकल्पाच्या बाजुने पुल उभारण्याबाबत जलसंपदा विभागाच्या बैठकीत ठरेल.
पांगारे,पळसावडे प्रकल्पाजवळ पुल
पांगारे, पळसावडे लघु पाटबंधारे प्रकल्पानजिक सांडवा दरवर्षी खचुन रस्ता ही वाहुन जात आहे. यावर पर्याय म्हणून याठिकाणी ऊंच पूल जलसंपदा विभागाकडुन बांधण्यात येईल. पांगारे, बोंडारवाडी, पळसावडे, मोरबाग, सांडवली या गांवचा दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |