- अजित जगताप
वडूज : कसबा पेठे मध्ये भाजपच्या पॉवर बँकेने महाविकास आघाडीचा विजय खेचून आणलेला आहे. त्यामुळे वडूज नगरीत फटाक्यांची आतषबाजी करुन कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालाने मरगळलेल्या महाविकास आघाडीमध्ये चैतन्य पसरले आह. हुतात्म्याची नगरी असलेल्या वडूज, ता. खटाव येथे महाविकास आघाडी विशेषत: कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी व विजयाच्या जयघोषाने तसेच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ व चिंचवड येथील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले होते. या दोन्ही मतदारसंघांमध्ये सातारा जिल्ह्यातून उपजिवीकेसाठी तसेच व्यवसायासाठी स्थायिक झालेल्या सातारवासियांनी या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला होता. विशेषत: कसबा पेठ येथील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कॉंग्रेस प्रदेश प्रतिनिधी रणजीतभैय्या देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे व अन्य कार्यकर्त्यांनी या दोन्ही मतदारसंघांमध्ये प्रचारानिमित्त आपले मित्र परिवार, नातेवाईक तसेच इतरांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. या अटीतटीच्या लढतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्याने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद निर्माण झालेला आहे.
सहा महिन्यापूर्वी सत्तांतर झाल्यामुळे भाजपचे उमेदवार व कॉंग्रेसचे उमेदवार यांच्या विजयासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले होते. अशा वेळेला विजयाची खात्री सर्वजण देत होते. परंतु काही चमत्कार अथवा काही मुद्दे वादग्रस्त बनवण्यासाठी सर्रास सोशल मीडियाचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे अनेक ग्रुपमध्ये सलोख्याचे असलेले वातावरण बिघडले होते. काहींनी व्यक्तिगत पातळीवर टीका-टीप्पणी सुरू केली. त्यामुळे ग्रुप ऍडमिनच्या समोरही अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, या निकालानंतर टीका-टीप्पणी व राजकीय मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. दुर्दैवाने प्रसारमाध्यमांमध्येही दोन गट पडल्याचे दिसून आले आहे.
वडूज नगरीमध्ये माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, इम्रान बागवान, आबासाहेब भोसले, विकास काटकर, रोहित मोरे, सोहम गुरव, पवन पंडित, महेश काटकर, आसीफ आतार, समीर मुलाणी, अनिस काटकर, वैभव यादव, ओमकार महामुनी, गणेश काटकर, वंचित बहुजन आघाडीचे तुषार बैले, विश्वास जगताप आदी मंडळींनी मतदारांचे आभार मानून जल्लोष साजरा केला. रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटप केले. सातारा वासियांनी तसेच कसबा पेठ येथील मतदारांनी महाविकास आघाडीला एकत्र येण्याचाच संदेश दिला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दिली आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |