पाटण : जुलै सन २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पाटण शहरातील नागरिकांचे संसार पाण्यात बुडाले. तर काही दुकानदारांचेही यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गोष्टीला सात महिन्यांचा कालावधी उलटला. परंतु, शासनाकडून पुरग्रस्त निधी जाहीर होऊनही अद्याप त्यांना मदत मिळालेली नाही. अशांना सरसकट मदत द्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सैनिकी युवा विद्यार्थी/विद्यार्थीनी सामाजिक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन नुकतेच विद्यार्थी संघटनेच्या वतीने पाटण तहसीलदारांना देण्यात आले आहे. यावेळी पाटण येथील पुरग्रस्त दुकानदार व महाराष्ट्र राज्य सैनिकी युवा विद्यार्थी, विद्यार्थीनी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विकास कदम, बाळासाहेब देसाई कॉलेजचे यिन अध्यक्ष किशोर लोहार हेही उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, जुलै सन २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये पाटण शहरातील अनेक नागरिकांचे संसार पाण्यात बुडाले. तर काही दुकानदारांचेही यामध्ये नुकसान झाले. त्यानंतर राज्य शासनाकडून पुरग्रस्त निधी जाहीर करण्यात आला. परंतु, या गोष्टीला सात महिन्यांचा कालावधी उलटला तरीही संबंधितांना मदत मिळाली नसून ते अद्यापही शासकीय मदतीपासून वंचित राहिले आहेत.
पाटण शहरातील पुरग्रस्त मदत मिळावी, यासाठी पाटण तहसील कार्यालयात अनेकवेळा हेलपाटे मारत असतात. मात्र, तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी त्यांना अटी व शर्तीची अनेक कारणे सांगतात. त्यामुळे त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागते. यामुळे पुरग्रस्तांना शासकीय मदत पोहोचण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तसेच पुरग्रस्तांसाठी आलेली मदत निकषांमध्ये अडकली आहे. लोकांना कोरोनासारख्या महामारीमुळे अगोदरच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत.
दरम्यान, पाटण शहरातील रहिवाशी व दुकानदारांना प्रशासनाकडून २०१९ मध्ये सरसकट मदत देण्यात आली होती. त्याप्रमाणे याही काळात कोणतीही अट न लावता त्यांना तात्काळ मदत देऊन न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री , अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही देण्यात आली आहे.
पूरग्रस्तांच्या भावना समजून घ्या
तहसीलदारांनी पाटणमधील पूरग्रस्तांच्या भावना समजून घ्याव्यात. हा ग्रामीण भाग असून याठिकाणी उद्योग धंदे नसल्याने आर्थिक दृष्ट्या मागास आहे. त्यात कोरोनाच्या संकटामुळे पुरग्रस्त मेटा कुटीला आले आहेत. प्रशासनाने लावलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात. तसेच २०१९ प्रमाणे सरसकट मदत मिळावी.
- विकास कदम (अध्यक्ष म.रा.सैनिकी युवा विद्यार्थी/विद्यार्थीनी सामाजिक संघटना)
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |