09:33pm | Oct 27, 2022 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील कराडजवळच्या खोडशी गावातील चौकात दिवाळीच्या पूर्वसंध्येला अर्थात रविवारी (दि. 23) रात्री तब्बल 9 फूट लांबीच्या मगरीचे ग्रामस्थांना दर्शन झाले होते. तेव्हापासून खोडशी ग्रामस्थ मगरीच्या दहशतीखाली होते. वनविभागाने देखील ग्रामस्थांना दक्ष राहण्याची सूचना करत ब्रिटिशकालीन बंधाऱ्यात न उतरण्याचे आवाहन केले होते. वनविभागाचे कर्मचारी गेली तीन दिवस मगरीला पकडण्याचे प्रयत्न करत होते. अखेर बुधवारी रात्री दहाच्या सुमारास मगरीला पकडण्यात वनविभागाला यश आल्यानंतर खोडशी ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
खोडशी (ता. कराड) गावातील मानवी वस्तीमध्ये असणार्या मुख्य चौकात रविवारी रात्री तब्बल 9 फूट लांब मगरीचे ग्रामस्थांना दर्शन झाले होते. यामुळे वनविभागाकडून दक्ष राहण्याची सूचना करत पाण्यात उतरताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले होते. काही दिवसांपासून तालुक्यातील टेंभू धरण, आटके ते पाचवड फाटा या परिसरात स्थानिक शेतकर्यांसह ग्रामस्थांना मगरीचे दर्शन होत आहे. या घटना ताज्या असतानाच खोडशी गावानजीक असणार्या बंधार्यातही मगरीचा वावर असल्याचे आता स्पष्ट झाले. 15 दिवसांपूर्वी खोडशी परिसरात असणार्या खडकावर मगर विश्रांती घेत असल्याचे काहींना दिसले होते.
यापूर्वीही झाले दर्शन
हीच मगर पुन्हा एकदा रविवारी रात्री खोडशीतील कृष्णा डेअरी चौकात दिसली होती. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मगर पाहण्यासाठी गर्दी केली. याच कालावधीत वनविभागाला सुद्धा माहिती देण्यात आली होती. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होईपर्यंत मगर बंधार्याच्या परिसरातील ओढ्यात निघून गेली होती.
खोडशीसह परिसरात खळबळ…
कराड तालुक्यात मागील वर्षभरापासून नदीकाठच्या गावात वारंवार मगरीचे दर्शन होत आहे. त्यामुळेच पोहण्यासाठी जाताना दक्षता घेणे आवश्यक बनले असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |