सातारा : बँकेकडून घेतलेल्या शैक्षणिक कर्जाची सातबार्यावर नोंद करण्यासाठी दहा हजारांची लाच मागणार्या वडूज, ता. खटाव येथील सर्कलला सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदाराने स्वत:च्या मुलाला शैक्षणिक कर्ज मिळावे म्हणून बँकेतून कर्ज प्रकरण केले होते. परंतू तारण म्हणून ठेवलेल्या मिळकतीचा सातबारा उतार्यावर नोंद झाल्यानंतरच संबंधिताला कर्जाची रक्कम मिळणार होती. यासाठी संबंधित तक्रारदार वडूज येथील मंडलाधिकारी (सर्कल) राजेंद्र मारुती जगताप (वय 57, रा. तलाठी कॉलनी, विलासपूर, गोडोली, सातारा) याने सातबार्यावर कर्जाच्या बोजाची नोंद करण्यासाठी तक्रारदाराला दहा हजारांची लाच मागितली होती. दरम्यान, आज दि. 29 रोजी दुपारी सर्कल जगताप यांना दहा हजारांपैकी 3 हजारांची लाच स्विकारताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.
या प्रकरणी सर्कल राजेंद्र मारुती जगताप याच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पोलीस ना. ताटे, पो. कॉ. काटकर, खरात यांनी केली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |