07:51pm | Sep 09, 2021 |
फलटण : मौजे विडणी, ता. फलटण गावच्या हद्दीत एका पिकअप गाडीत जनावरे भरून ती कत्तलीसाठी नेत असताना फलटण ग्रामीण पोलिसांनी पकडून सुमारे 13 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी फलटण येथील 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल दि. 8 रोजी जाधववस्ती, अब्दागिरवाडी, मौजे विडणी, ता. फलटण गावच्या हद्दीत अझीम कुरेशी, इरफान कुरेशी, जावेद कुरेशी, तौफिक कुरेशी, दिशांत कुरेशी (सर्व रा.कुरेशीनगर, फलटण) यांनी बेकायदा बिगर परवाना कत्तल करण्यासाठी दाटीवाटीने जनावरे डांबून ठेवली व त्यांची खाण्या-पिण्याची कोणतीही सोय केली नव्हती. तसेच सदरची जनावरे बेकायदा बिगर परवाना कत्तलीकरीता नेण्यासाठी पिकअप गाडीत भरुन चालवली असताना फलटण ग्रामीण पोलिसांनी पकडली असून त्यामध्ये 8 लाख 25 हजार रुपये किंमतीची जनावरे व 5 लाख रुपये किंमतीचे पिकअप चारचाकी वाहन असा एकूण 13 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबतचा अधिक तपास सपोनि दराडे करीत आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |