02:59pm | Mar 06, 2021 |
मुंबई: मराठी सिनेमाला जागतिक ओळख मिळवून देणार्यांमध्ये आता एका नव्या मराठमोठ्या दिग्दर्शकाचा समावेश झाला आहे. केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये यंदा मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकरच्या ‘स्थलपुराण’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. या महोत्सवामध्ये स्थलपुराण चित्रपटाला अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे दोन पुरस्कार मिळाले आहेत.
केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये यंदा अक्षयला मिळालेला ‘सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपट’ हा मानाचा पुरस्कार आशियातल्या सिनेमांच्या विकासासाठी स्थापित असलेल्या एका जागतिक संस्थेकडून दिला जातो. यंदा यामध्ये ‘सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपट’ आणि ‘भारतातील सर्वोत्कृष्ट नवीन दिग्दर्शक’ या दोन पुरस्कारांचा समावेश आहे. अक्षयच्या मराठमोळ्या ‘स्थलपुराण’ या चित्रपटाने आपला झेंडा रोवला आहे. पद्मविभूषण अदूर गोपालकृष्णन यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर, कलाकार उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्यानंतर अक्षयने आपल्या भावना व्यक्त करत चित्रपटाचे निर्माते संजय शेट्ये यांचे तसेच ‘स्थलपुराण’च्या सर्व टीमचे आभार मानले आहेत.
अक्षय इंडीकरला त्याच्या या चित्रपटासाठी यापूर्वीही अनेक मानाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. आशिया खंडाचा अकॅडमी अवॉर्ड अशी ओळख असलेला ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ हा पुरस्कारदेखील दिग्दर्शक अक्षय इंडीकरला मिळाला आहे. फिल्म जगतातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. ‘स्थलपुराण’ या चित्रपटातील विशेष दिग्दर्शकीय कामगिरी लक्षात घेता त्याला हा पुरस्कार देण्यात आला होता. ऑस्ट्रेलियातील ‘आशिया पॅसेफिक स्क्रीन अकॅडमी’, ‘ग्रिफिथ स्कूल’ आणि ‘युनेस्को’ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.
‘उदाहरणार्थ नेमाडे’ या वेगळ्या धाटणीच्या सिनेमापासून आपल्या कारकीर्दीची खर्या अर्थाने सुरुवात करणारा अक्षय इंडीकर, आपल्या स्वतंत्र व अनोख्या शैलीमुळे जगभरात नावाजला गेला आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |