10:18pm | Mar 01, 2023 |
फलटण : फलटण तालुक्याचे हक्काचे पाणी बारामतीकरांना देऊन मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सत्तेची पोळी भाजून घेतली. परंतु त्या बदल्यात ज्या फलटणकरांनी यांना तब्बल अडीच दशके निवडून दिले, त्यांच्या बरोबरच मंत्रिपद टिकवण्यासाठी गद्दारी केली. एकंदरीतच मिस्टर रामराजेंसारखा गद्दार आणि लाचार पंटर फलटण तालुक्याला मिळाला होता, अशी घणाघाती टीका खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मिस्टर रामराजेंवर नाव न घेता केली आहे.
ते फलटण तालुका संपर्क दौर्यात तरडगाव येथे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर धनंजय साळुंखे-पाटील, सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस जयकुमार शिंदे, तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, अरुण शेलार, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, अनुप शहा, अतुल गायकवाड, वसीम मणेर, महिला आघाडीच्या पदाधिकारी, फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते, बबलू मोमीन, मा. नगरसेवक जाकीरभाई मणेर, अनिल ढमाळ, वसंतराव ठोंबरे, यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
लवकरच रेल्वेची टेंडर निघतील, असे सांगून रेल्वे चालत नाही असे लोकांना भासवण्याचे काम सध्या विरोधक करीत आहेत. यांची जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही, असे सांगून गद्दारामध्ये यांच नावं घेतलं जाईल, असे गंभीर वक्तव्य खा. रणजितसिंह यांनी केले.
स्वतःच्या जमिनी सोडवून घेण्यासाठी यांनी आपल्या मंत्रीपदाच्या काळात कामे केली. मात्र तुम्हांला शरद पवारांचा फोटो लावायला लाज वाटतेय. फलटण तालुका तुम्हाला जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही असे सांगून निवडणुकीला माझ्या समोर या. आणि तुम्ही नाही आलात तर बारामतीकरांना आणा, असे खुले आव्हान यावेळी खा. रणजितसिंह यांनी मिस्टर रामराजेंंना दिले.
आपण आपल्या कार्यकाळात फलटणसाठी जे शक्य आहे ते करणार असून आपण मात्र अजित दादांशी सेवा केलीत. अजितदादांनी बारामतीला विकासाचं मॉडेल तयार केले आहे. पण तुमची लायकी अजितदादांनी भाषणात काढली होती, असेही यावेळी खासदारांनी निदर्शनास आणून दिले.
निरा - देवघर चे आपल्या वाट्याचे पाणी बारामतीला दिले होत.े ते आपण खासदार झाल्यानंतर पुन्हा तालुक्यातील जनतेसाठी आणले. फलटणकर शरद पवारांचे बूट पुसायला पुढे आहेत. मात्र मी जनतेची कामे करूनही मला आपण खलनायक उपाधी देताय? असा खडा सवाल खा. रणजितसिंह यांनी उपस्थित केला.
निरा - देवघरचे काम हे रामराजेंचे एका दिवसाचे होते. मात्र त्यानी जनतेला पाण्यासाठी झुलवत ठेवलं व बारामतीची चाकरी केल्याचा खा. रणजितसिंह यांनी आरोप केला.
तरडगाव मध्ये कावीळीची 200 ते 250 जणांना बाधा झाली होती. जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्याने अशुद्ध पाण्यामुळे आजार पसरल्याचे यावेळी तरडगाव येथील नागरिकांनी लक्षात आणून दिले. यावेळी मे महिन्या पर्यंत प्राधिकरण योजना पूर्ण होईल, असे अधिकार्यांनी सांगितले. याचवेळी 5 वर्षापर्यंत ही योजना पूर्ण न करणार्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे खासदार रणजितसिंह यांनी आदेश दिले. अन्यथा अधिकार्यावर कारवाई करावी लागेल असा इशारा यावेळी दिला.
तालुक्यातील विकासासाठी सत्तेचा लोलक हलता ठेवा असे सांगून बारामती चे पळविलेले पाणी पुन्हा खासदार रणजित दादांनी तालुक्यासाठी आणले आहे आपण सभापती म्हणून काय केले? असा सवाल अनुप शहा यांनी उपस्थित केला.
फलटणची रेल्वे कै. हिंदुराव ना. निंबाळकर यांनी आणली. मात्र रेल्वे मंजूर झाली तेव्हा जाफर शरीफ नव्हे तर रामविलास पासवान हे रेल्वे मंत्री होते, हे सांगून रामराजेच्या चिठ्ठीने कोणाला नोकरी मिळाली? तर स्वतःची मुलगी व मुलगा यांना, असाही टोला यावेळी अनुप शहा यांनी लगावला.
खा. रणजितसिंह यांनी दुसरी एमआयडीसी फलटणला आणली. मात्र खासदारांबद्दल केवळ संभ्रम निर्माण करणे एवढेच काम विरोधकांचे असून दादांनी सकारात्मक काम केले आहे. ते काम जनतेपर्यंत पोहोचवणे हे आपले काम आहे. येणार्या निवडणुकीत आपली भूमिका महत्वाची असल्याचे यावेळी शहा यांनी निदर्शनास आणून दिले.
आजपर्यंत चे फलटण तालुक्यातील राजकारण फक्त पाण्यावर झाले आले. तरडगाव गावात सर्वात जास्त निरा - देवघरच्या पाण्याचा लाभ होणार असल्याचे जयकुमार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. राज्याच्या सरकारमधून तालुक्यातील दुष्काळ संपवण्यासाठी निरा - देवघर चा प्रश्न सोडवला आहे. त्यामुळे आता तालुक्यातील राजकारण थांबवा व विकासाच्या मागे उभे रहा, असे आवाहन यावेळी जयकुमार शिंदे यांनी केले.
यावेळी तरडगाव, शिंदेमाळ, विठ्ठलवाडी, चांभारवाडी, कुसूर आदी भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फलटण तालुका संपर्क दौर्या दरम्यान हिंगणगाव येथे कृष्णा - खोरे उपाध्यक्ष म्हणजे अर्ध्या टी. एम. ची. चा भगीरथ अशी उपहासात्मक टीका खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मिस्टर रामराजे यांच्यावर केली.
यावेळी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, फलटण शुगर वर्क्स चे माजी चेअरमन व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रल्हादराव साळुंखे पाटील, धनंजय साळुंखे पाटील, सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस जयकुमार शिंदे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, शहराध्यक्ष अमोल सस्ते, अमित रणवरे, भाजपा महिला आघाडीच्या सौ. उषा राऊत, सौ. इंगोले, हिंगणगाव, आळजापूर, कापशी, टाकूबाईचीवाडी, शेरेचीवाडी, सालपे,सासवड आदी भागातील आजी माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, रामराजे 15 वर्ष मंत्री असताना निरा -देवघर प्रकल्पाच्या फाईल वर सही केली नाही. फलटण तालुक्यातील जनतेचा 25 वर्षाचा पाण्याचा हक्क त्यांनी हिरावला असून तालुक्यातील जनता अशा गद्दारांना आता योग्य उत्तर देईल, असे खा. रणजितसिंह म्हणाले.
आता धोम - बलकवडीच्या माध्यमातून जनतेला पाणी देण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केले असून आपण केवळ तुमचा सेवक आहे, असे यावेळी खासदार निंबाळकर यांनी नम्रपणे सांगितले. तर निरा - देवघर च्या अतिरिक्त पाण्यामधून आता आठ महिने सिंचनासाठी पाणी मिळणार असून लवकरच ते पाणी 12 महिने शेतकर्यांना मिळेल, अशी ग्वाही यावेळी खासदार रणजितसिह यांनी दिली.
लोणंद - फलटण रेल्वे चालत नाही, असे म्हणणार्या गद्दारांनी रेल्वे रुळावर झोपून दाखवावे, असाही टोला यावेळी खा. रणजितसिंह यांनी लागवला.
आपण फक्त धोम -बलकवडीचे पाणीच आणले नाही तर वडिलांनी पाहिलेले रेल्वेचे स्वप्न लोणंद - फलटण रेल्वे प्रत्यक्षात आणून ते पूर्ण केले आहे. लवकरच पंढरपूर रेल्वे मार्गाची निविदा निघणार असून बारामती रेल्वे मार्गाचे कामही लवकरच सुरु करू, अशी ग्वाही यावेळी खा.रणजितसिंह यांनी दिली.
ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, हा संपर्क दौरा नसून हा सत्तेचा परिवर्तन मेळावा आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून सत्तेला सुरुंग लावण्याचे काम आपल्याला करायचे आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कामाचा धडाका लावला आहे. धोम - बलकवडीच्या कामाचा धसका मिस्टर रामराजेंनी घेतला आहे, असे यावेळी प्रल्हादराव पाटील यांनी सांगितले. केवळ निवडणूक काळात पाणी सोडून पाण्याच्या प्रश्नावर निवडणुका जिंकल्याचा टोला मिस्टर रामराजे यांचे नाव न घेता पाटील यांनी लगावला.
माजी आमदार कै. चिमणराव कदम यांच्या कामाचा उल्लेख यावेळी पाटील यांनी केला. विरोधकांच्या वल्गनांना आता जनता भुलणार नसून खासदारांचा मेरू कोणी रोखू शकत नाही, असे यावेळी पाटील यांनी सांगितले. खा. रणजितसिंह हे ज्या ठिकाणी चुकतील त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे, असे यावेळी साळुंखे पाटील म्हणाले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपला गट भाजपा मध्ये विलीन करण्याची घोषणा यावेळी प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी केली.
माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यावेळी बोलताना म्हणाले, मोठे प्रकल्प या भागात आणले पाहिजेत, केंद्र शासनाच्या माध्यमातून खासदार मोठे काम करत आहेत. सामाजिक विचार सामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. तालुक्यातील केवळ डीपी बसवून चालणार नसून येणारी वीज वाढवली पाहिले, ही बाब यावेळी भोसले यांनी निदर्शनास आणून दिली. लवकरात लवकर आपले काम खासदारांच्या माध्यमातून पूर्ण होईल, वेगवेगळ्या विषयांवर खासदार कार्यरत असून राजकारणापेक्षा समाजकारणावर आपण भर देणार असल्याचे यावेळी भोसले यांनी सांगितले.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |