12:37pm | Feb 20, 2021 |
सातारा: डफळवाडी (ता.पाटण) येथील अपप्रवृत्त वृत्तीचे लोक आमच्या कुटुंबातील महिलांन शिवीगाळ करून मारहाण करून पाण्याच्या पाईपची मोडतोड केली आहे. आम्ही वापरत असलेले पाणी बेकायदेशीररित्या त्यांच्या शेतात वळवले आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याबाबत कोणतीही कारवाई होत नाही. आम्ही तफळवाडी येथील शेतात लोकशाही मार्गाने साखळी उपोषण सुरू केले आहे. आम्हाला येत्या आठ दिवसांत न्याय न मिळाल्यास आम्ही सर्व मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा डफळवाडी येथील राजेंद्र शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
राजेंद्र शिंदे पुढे म्हणाले, आमचे डफळवाडी येथे 24 हेक्टर 10 आर जमीन क्षेत्र आहे. त्यापैकी काही जमीन शेतीसाठी वापरत आहोत. त्यामध्ये तीन ठिकाणी नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत. त्यातील एका झर्याचे पाणी गावातील लोक पिण्यासाठी व शेतीसाठी वापरतात. उर्वरित एका झर्याचे पाणी आमच्या वयक्तिक शेतीसाठी वापरत आहोत. 2013 मध्ये आम्ही वापरत असलेल्या पाण्याला गावातील काही अपप्रवृत्तीच्या लोकांकडून अडथळा निर्माण करण्यात आल्यामुळे आम्ही न्यायालयाकडे दाद मागितली. निकाल आमच्यासारखाच दिला गेला. दि.23 नोव्हेंबर 2020 रोजी गावातील काही जणांनी आमच्या कुटुंबातील महिलांना शिवीगाळ, मारहाण करून आमच्या पाण्याच्या पाईपांची मोडतोउ केली. तसेच आम्ही वापरत असलेले पाणी त्यांच्या शेतात वळवले. या घटनेची तक्रार पाटण पोलिस ठाण्यात गेलो असता तेथे आम्ही दमदाटी व अरेरावीची भाषा वापरली. संबंधितांनी पाणी अडविल्याने आमच्या शेतीचे नुकसान होवून आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
याबाबत निवेदन देवून अथवा तक्रार करून कोणतीही कारवाई होत नसल्याने आम्ही दि.8 फेब्रुवारी 2021 पासून डफळवाडी येथील आमच्या शेतात लोकशाही मार्गाने उपोषण सुरू केले आहे. येत्या आठ दिवसांत आम्हाला न्याय न मिळाल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने मंत्रालयासमोर आत्मदहन करणार आहोत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पत्रकार परिषदेला धुळाराम जगन्नाथ शिंदे, रामचंद्र धुळाराम शिंदे, पूजा धुळाराम शिंदे, यशोदाबापू शिंदे, उमेश कोंडिबा शिंदे आदी उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |