12:37pm | Aug 13, 2022 |
फलटण : सासकल ता. फलटण येथील सासकल ग्रामपंचायतच्यावतीने तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे याबाबत चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी सासकल ग्रामस्थांनी उप आयुक्त, पुणे, जिल्हाधिकारी सातारा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती फलटणच्या गट विकास अधिकारी, तहसीलदार फलटण व उपविभागीय अधिकारी फलटण यांच्याकडे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मात्र चौकशी करण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
दि. 12 रोजी उप मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी पत्र काढून जिल्हास्तरावरून इतर तालुक्यातील गट विकास अधिकारी यांचेमार्फत चौकशी सुरु करण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई करण्याविषयी लेखी कळवले आहे. त्यात आपण उपोषणापासून परावृत्त व्हावे असे म्हटले आहे. एका बाजूला संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आनंदाने सुरु असताना उप मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी दिलेल्या लेखी पत्रानंतर ग्रामस्थांनी तात्पुरत्या स्वरुपात आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याचे कळवले आहे.यावेळी बैठकीस, शिवाजी मुळीक,रघुनाथ गणपत मुळीक, विनायक मदने, दिनेश मुळीक, बी.डी घोरपडे, राजेंद्र घोरपडे, गोरख मुळीक व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर अर्ज हा सबळ पुराव्यांसह जोडल्यामुळे तत्कालीन ग्रामसेवक अंगराज खाशाबा जाधव तसेच तत्कालीन सरपंच लता विकास मुळीक व विभूती मोहन मुळीक यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराबाबत ठपका ठेवला आहे. यात प्रशासन ही कोणत्याही स्वरूपाची ठोस कारवाई करत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. विनायक नारायण मदने व इतर ३५ ग्रामस्थांनी मा. जिल्हाधिकारी यांचेकडे दि.३/६/२०२२ रोजीचा मान. जिल्हाधिकारी यांना प्राप्त अर्ज तारीख ६/६/२०२२ रोजी तक्रार करण्यात आली. यावर उप जिल्हाधिकारी (महसूल) यांनी क्र.मह/३/अभि/का/१५४७/२०२२ दि.६/६/२०२२ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण पाठवण्यात आले होते. सदर पत्रामध्ये अर्जदार यांचे संदर्भीय अर्जातील मागणीचे अनुषंगाने नियमानुसार उचित कारवाई करावी व केलेल्या कारवाईबाबत अर्जदार यांना आपल्या कार्यालयाचे स्तरावरून परस्पर अवगत करण्यात यावे अशी आदेश देण्यात आले होते. त्यानंतर १ महिन्याहून अधिक काळ उलटला तरी कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही.
या संबंधात उप आयुक्त (आस्थापना) पुणे विभाग पुणे यांच्याकडे २७/०६/२०२२ रोजी तक्रार करण्यात आली होती. त्यांनी ही जिल्हाधिकारी यांना दिनांक २८/६/२०२२ रोजी क्र.विकास/आस्था/ग्रा.पं.-२/कावि-४५०/२०२२ दि.२८/६/२०२२ रोजी चौकशीचे आदेश दिले. या आदेशात उप जिल्हाधिकारी(महसूल) यांना सांगण्यात आले आहे की, सदर अर्जात नमूद विषयाबाबत सविस्तर चौकशी करून नियमानुसार तात्काळ उचित कारवाई करावी व केलेल्या कारवाईबाबत संबंधित अर्जदार यांना परस्पर कळवण्यात यावे असे सांगण्यात आले होते.परंतु या अर्जांच्या अनुशंगाने कोणतेही कारवाई झाली नाही त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक होते. त्यामुळे येत्या १५ ऑगस्ट २०२२ ला तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती फलटण कार्यालय, ग्रामपंचायत सासकल येथे आमरण उपोषण करण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला होता. हे उपोषण मागे घ्यावे यासाठी दि.११/८/२०२२ रोजी तहसील कार्यालय येथे बैठक लावण्यात आली होती.या बैठकीत गटविकास अधिकारी व तहसीलदार फलटण यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली.तसेच वरील अनुषंगाने दोषींवर कारवाई करण्याची तयारी त्यांनी दाखवली. तरीही ग्रामस्थ उपोषणावर ठाम राहिले होते. आज पुन्हा गट विकास अधिकारी अमिता गावडे यांची भेट घेऊन ग्रामस्थांनी चर्चा केली.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |