02:03pm | Nov 21, 2022 |
नवी दिल्ली : अरुण गोयल यांनी आज भारताचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. अरुण गोयल हे पंजाब केडरचे १९८५ च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्यासह निवडणूक पॅनेलमध्ये सामील होतील.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवृत्त आयएएस अधिकारी अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अरुण गोयल यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. सुशील चंद्र यांच्या निवृत्तीनंतर तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर १५ मे पासून तीन सदस्यीय आयोगातील एका निवडणूक आयुक्ताचे पद रिक्त होते. आज या पदावर अरुण गोयल यांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय कायदे मंत्रालयाने शनिवारी एक प्रसिद्धी पत्रक जारी करत याबाबतची माहिती दिली.
पंजाबमधील वरिष्ठ आयएएस अधिकारी अरुण गोयल ३१ डिसेंबर २०२२ रोजी वयाच्या ६० व्या वर्षी सेवानिवृत्त होणार होते. मात्र, त्यांनी ४० दिवस आधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते मागील अनेक वर्षांपासून केंद्रात प्रतिनियुक्तीवर काम करत होते. त्यांनी पंतप्रधान कार्यालयातही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |