08:38pm | Jun 02, 2021 |
वाई : आमदार मकरंद पाटील यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वाई, खंडाळा व महाबळेश्वर या तीन तालुक्यांतील नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे, यासाठी कोरोनावरील व्हॅक्सिन उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली.
वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघासाठी करोना प्रतिबंधक लसीचे डोस खरेदी करण्याची आमची तयारी आहे. वाई, खंडाळा येथील औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी, महाबळेश्वर पाचगणी येथील हॉटेल व्यावसायिक त्यांचे कर्मचारी व नातेवाईक, बँका पतसंस्था येथील अधिकारी कर्मचारी त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी संबंधितांनी लस खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. या लसी अधिकाधिक संख्येत उपलब्ध करून देण्यासाठी आ मकरंद पाटील यांनी पवार यांना विनंती केली. यानंतर पवार यांनी तात्काळ पुणे येथील लस उत्पादक कंपनी 'सिरम इन्स्टिट्यूट' चे डायरेक्टर डॉ. जाधव यांना फोन करून सूचना केल्या आहेत. लवकरच सिरम इन्स्टिट्यूटच्या डॉ. जाधव यांनी भेट घेऊन मतदार संघातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण वेगानं पूर्ण करण्यासाठी आ मकरंद पाटील प्रयत्नशील आहेत. त्यांनी शुक्रवारी ( दि 4) आपल्याला हडपसर येथे भेटायला बोलावले आहे. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर किती व्हॅक्सिन वायल उपलब्ध होतात, हे पाहून वाई मतदार संघातील लोकांसाठी विशेषतः विविध इंडस्ट्री, हॉटेल, बँक, पतसंस्था व इतर क्षेत्रातील मधील कामगारांसाठी लसीकरण मोहीम राबविणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. आमदार पाटील यांनी महाबळेश्वर सारख्या दुर्गम डोंगराळ भागात, वाई व खंडाळा तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, उपकेंद्रे, सामाजिक कार्यकर्ते, औद्योगिक सेलच्या माध्यमातून मोफत उपचाराची छोटी-मोठी सहाशे रुग्णांसाठी कोरोना काळजी केंद्र ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सह सुरु केली आहेत. गावोगावी संस्थात्मक विलीगीकरण केंद्रेही सुरु केली आहेत. या परीसरात मागील वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे वाई, खंडाळा, शिरवळ, लोणंद येथील औद्योगिक, महाबळेश्वर पाचगणीच्या हॉटेल व्यवसायिक, पर्यटन, शेतकरी, निवासी शाळा यांचे अर्थकारण बिघडले आहे. ग्रामीण भागातही रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर लोकांचे लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या मनातील भीती कमी झाली पाहिजे. याबाबत काही कंपन्यांचे व्यवस्थापन आणि महाबळेश्वर येथील हॉटेल व्यावसायिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांच्याशी संवाद साधला आहे. त्यांनी व्हॅक्सिनसाठी निधी देण्याचे मान्य केले. त्यामुळे व्हॅक्सिन उपलब्ध करून घेण्यासंदर्भात शरद पवार यांची आमदार मकरंद पाटील यांनी भेट घेतली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |