वाई : मागील आठवड्यात भरतगाव (ता सातारा) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दोन महिला शिक्षिकांमध्ये मारामारी झाली होती. दोन्ही महिला शिक्षकांनी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीही दाखल केल्या आहेत. या दोन्ही शिक्षिकांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी निलंबन केले आहे.
सातारा तालुक्यातील भरतगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपशिक्षिका मनीषा भुजबळ व रंजना चौरे या दोन महिला शिक्षिकांमध्ये मारामारी झाली होती. या घटनेची शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी गांभीर्याने दखल घेतली होती. त्यांनी सातारा पंचायत समितीकडून तात्काळ अहवाल मागविला होता. याबाबत सविस्तर अहवाल शिक्षण विभागाकडून विनय गौडा यांच्याकडे सादर करण्यात आला होता.
भरतगाव शाळेत झालेल्या मारहाणीच्या घटनेने भरतगावची बदनामी झाली होती. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचीही बदनामीही झाली. याबाबत भरतगाव ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने दोन्ही शिक्षकांची बदली करा अन्यथा शाळेला टाळे ठोकू, असा इशारा दिला होता. दोन महिला शिक्षिकांमध्ये शाळेतच झालेली मारहाणीची घटना गंभीर असल्याने गौडा यांनी दोन्ही शिक्षिकांना निलंबित केले आहे. त्यामुळे रंजना चौरे यांचे मुख्यालय खटाव, तर मनीषा भुजबळ यांचे मुख्यालय कराड येथे असणार आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |