11:26pm | May 17, 2020 |
मेढा : म्हाते खुII ता.जावली येथे ऐण लॉकडाऊनमध्ये मुंबईवरून आलेल्या कुटुंबातील एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून, त्या मुलाचा मृतदेह कुटुंबीयांनी सहा दिवस घरातच ठेवला होता. परंतु सजग शेजाऱ्यांमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान शवविच्छेदन झाल्या नंतरच हा मृत्यू कशामुळे झाला आहे हे समजणार आहे. दरम्यान सहा दिवस उलटूनही कुटुंबीयांनी हा मृतदेह घरातच का ठेवला? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, मुळचे म्हाते खुII ता.जावली येथील जयवंत विठ्ठल दळवी हे अनेक वर्षांपासून कामानिमित्त मुंबई मध्ये राहत असतात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २७ मार्चला दळवी कुटुंब मुंबईवरून म्हाते खुII येथे आले होते. जयवंत दळवी यांचा पंधरा वर्षीय मुलगा अथर्व दळवी हा गेल्या सात ते आठ महिन्यांपासून आजारी होता. त्याच्यावर योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या औषधांच्या माध्यमातून उपचार सुरू होते. अशी माहिती मिळत आहे.
मुंबईवरून येवून दीड महिना उलटल्यानंतर संबंधित पंधरा वर्षीय मुलाचा घरातच मृत्यू झाला. मात्र मृत्यू झाल्यानंतरही कुटुंबीयांनी याबाबतची माहिती पोलिस यंत्रणेला दिली नाही. शेजारी राहणाऱ्या लोकांना दुर्गंधी सुटल्यानंतर त्यांनी दळवी यांच्या घरात जावून याबाबत तपासणी केला असता, त्या पंधरा वर्षीय मुलचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर येथील नागरिकांनी याबाबतची माहिती मेढा पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सातारा येथील सिविल हॉस्पिटलमध्ये शव विच्छेदनासाठी पाठवला. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तो मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने स्वीकारला नाही. त्यामुळे तो मृतदेह पुन्हा मेढा येथील ग्रामीण रुग्णालय पाठवण्यात आला आहे. रात्री मृतदेहाची उत्तरीय तपासणी करता येत नसल्याने उद्या सकाळी या मृतदेहाचे शवविच्छेदन होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान उद्या सकाळीच त्या पंधरा वर्षे मुलाचा मुलाचा मृत्यू कशाने झाला आहे हे स्पष्ट होणार आहे. मात्र मृत्यू होवून सहा दिवस मृतदेह घरात ठेवल्याने या मृत्यूबद्दल सस्पेन्स निर्माण झाला असून, हा मृत्यू नैसर्गिक, आत्महत्या, खून की कोरोनामुळे हे मात्र उद्या सकाळीच स्पष्ट होणार आहे. तत्पुर्वी या मृत्यूच्या सस्पेन्समुळे जावली तालुक्यात मात्र खळबळ उडाली आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |