पुसेगाव : जांब ता.खटाव येथील मागासवर्गीय 15 टक्के अनुदान न देणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करावी अशी मागणी गटविकास अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे रिपाईचे गणेश भोसले यांनी केली आहे .
जांब येथील मागासवर्गीय अनुसूचित जाती (बौद्ध) समाजास गेली 5 वर्षे मागासवर्गीय यांचे 15 टक्के अनुदान दिले नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे मागील 5 वर्षाचे रेकॉर्ड उपलब्ध नाही असे सांगितले आहे. तसेच आम्ही समाजातील नागरिकांनी लेखी देखील मागणी केली होती त्याचे कोणते उत्तर दिले नाही. तरी संबंधित ग्रामसेवक यांची खाते निहाय चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.
मागासवर्गीयांच्या आजपर्यंतचे अनुदान समाजास द्यावे. तसेच तालुक्यातील काही ग्रामसेवक मागासवर्गीय समाजातील ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक यांना विचारात न घेता परस्पर मागासवर्गीय अनुदान योजना इतर वळवत आहेत. अशा ग्रामसेवकावर मागासवर्गीय अनुदान व निधी या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी. आपल्या स्तरावर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना लेखी आदेश काढावे की मागासवर्गीय अनुदान निधी इतरत्र योजना राबवत असताना समाजातील प्रतिष्ठित नागरिक व सदस्यांना विचारात घेऊन करावे. वरील बाबींचा विचार करून योग्य ती कारवाई करावी. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.
यावेळी निवेदन देताना रिपाईचे (आठवले) गटाचे खटाव ता.कार्याध्यक्ष गणेश भोसले, जिल्हा नेते अजित नलावडे, मयुर बनसोडे, नेते दत्ता शिंदे, महेंद्र माने, संदीप काळे, जितेंद्र सोनवले, चरणदास सोनवले, अमोल रणदिवे उपस्थित होते.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |